Knowledge Centre
HDFC ERGO #1.5 Crore+ Happy Customers
#1.5 कोटी+

आनंदी कस्टमर्स

HDFC ERGO 1Lac+ Cashless Hospitals
1 Lac+

कॅशलेस हॉस्पिटल

HDFC ERGO 24x7 In-house Claim Assistance
24x7 इन-हाऊस

क्लेम असिस्टन्स

HDFC ERGO No health Check-ups
कोणतीही आरोग्य

तपासणी नाही

होम / ट्रॅव्हल इन्श्युरन्स / भारतातून शेंगेन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स

भारतातील शेंगेन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स

शेंगेन व्हिसा, 26 युरोपियन देशांमध्ये निरंतर प्रवासासाठी निर्णायक आहे. ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या आवश्यक घटकासह काळजीपूर्वक तयारीची मागणी करतो. हा व्हिसा फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्पेन सारख्या राष्ट्रांना समाविष्ट करतो, ज्यामुळे प्रवाशांना या प्रदेशात स्वतंत्रपणे मार्गक्रमण करण्यास सुलभता मिळते. भारताकडून अर्ज करताना, शेंगेन व्हिसा इन्श्युरन्स मिळवणे अत्यावश्यक होते. भारतातील शेंगेन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्सला विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, प्रत्यावर्तन आणि इतर अनपेक्षित परिस्थिती € 30,000 किंवा अधिक कव्हर केल्या पाहिजेत. इन्श्युरन्स शेंगेन क्षेत्रात आणि संपूर्ण कालावधीसाठी वैध असणे आवश्यक आहे.

असंख्य इन्श्युरन्स प्रोव्हायडर या निकषांची पूर्तता करण्यासाठी निर्मित पॅकेजेस ऑफर करतात. ज्यामुळे त्रासमुक्त ॲप्लिकेशन प्रोसेस सुलभ होते. खरेदी करताना पॉलिसी वर स्पष्टपणे व्हिसा ॲप्लिकेशन दरम्यानची गुंतागुंत टाळण्यासाठी "शेंगेन व्हिसा इन्श्युरन्स" उल्लेख असल्याची सुनिश्चिती करा. कव्हरेज, प्रीमियम आणि अतिरिक्त लाभांचा विचार करून विविध प्लॅन्सची तुलना करणे विवेकपूर्ण आहे. भारताकडून शेंगेन व्हिसासाठी पुरेसा ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवणे केवळ औपचारिकता नाही तर सुरक्षित आणि सुलभ युरोपियन प्रवास सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे, योग्य आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन निवडणे तणावमुक्त प्रवासाच्या अनुभवासाठी महत्त्वाचे आहे.

तुम्हाला शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?

शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स युरोपमध्ये त्रासमुक्त प्रवासासाठी आकस्मिक घटनांपासून संरक्षण प्रदान करते.. शेंगेन व्हिसासाठी विशिष्ट कारणांसाठी शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स अपरिहार्य आहे, येथे काही आहेत:

प्रवास व्यत्यय कव्हरेज: हे नैसर्गिक आपत्ती किंवा निघण्यापूर्वी आकस्मिक आजार यासारख्या अनपेक्षित घटनांमुळे ट्रिप रद्द करणे किंवा व्यत्यय येण्यापासून संरक्षण करते.

कायदेशीर संरक्षण: दुर्दैवी घटनांमध्ये इतरांना नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या स्थितीत शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कायदेशीर खर्च आणि दायित्वांना कव्हर करते. ज्यामुळे फायनान्शियल तणाव टाळणे शक्य ठरते.

मनःशांती: कॉम्प्रिहेन्सिव्ह शेंगेन व्हिसा इन्श्युरन्स मुळे शेंगेन क्षेत्राचे चिंतामुक्त अन्वेषण सुनिश्चित होते. ज्यामुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत संभाव्य फायनान्शियल भार न टाकता त्यांच्या प्रवास कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करता येते.

परदेशात आपत्कालीन सहाय्य: पासपोर्ट हरवणे, विमान रद्दीकरण किंवा आपत्कालीन वैद्यकीय निर्वासन यासारख्या अनपेक्षित घटनांमध्ये हे 24/7 सपोर्ट आणि असिस्टन्स प्रदान करते.

अनिवार्य आवश्यकता: शेंगेन व्हिसा अधिकाऱ्यांना भारत किंवा इतर कोणत्याही नॉन-शेंगेन देशातील शेंगेन व्हिसासाठी पुरेसे ट्रॅव्हल इन्श्युरन्स आवश्यक आहे. व्हिसा मंजुरीसाठी ही पूर्व आवश्यकता आहे.

व्हिसा ॲप्लिकेशन अनुपालन: वैध शेंगेन व्हिसा इन्श्युरन्स विशिष्ट निकषांची पूर्तता न केल्यास तुमचे व्हिसा ॲप्लिकेशन नाकारले जाऊ शकतो, ज्यामुळे पुन्हा ॲप्लिकेशन करताना विलंब आणि अतिरिक्त खर्च होऊ शकतो.

हेल्थकेअर कव्हरेज: शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स गंभीर आजार किंवा अपघातांच्या बाबतीत हॉस्पिटलायझेशन, औषधे आणि प्रत्यावर्तनासह €30,000 किंवा अधिक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी कव्हरेज सुनिश्चित करते.

शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे लाभ

शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स युरोपच्या शेंगेन क्षेत्रात अखंड शोध घेण्यासाठी मनःशांती आणि आवश्यक कव्हरेज प्रदान करते. येथे काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत:

1

कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल कव्हरेज

हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी व्यापक कव्हरेज प्रदान करते, शेंगेन देशांतील तुमच्या प्रवासादरम्यान मनःशांती सुनिश्चित होते.

2

फायनान्शियल सुरक्षा

वैद्यकीय आणीबाणी, फ्लाईट कॅन्सलेशन किंवा सामान हरविणे यामुळे निर्माण होणाऱ्या आकस्मिक खर्चापासून संरक्षण प्राप्त होते. परदेशात असताना फायनान्शियल भार कमी केला जातो.

3

24/7 सहाय्य

विविध संकटांसाठी 24/7 मदत ऑफर केली जाते. ज्यामध्ये वैद्यकीय स्थलांतरण, अनपेक्षित परिस्थितीत त्वरित मदत सुनिश्चित करणे यांचा समावेश होतो.

4

आवश्यकता पूर्तता

शेंगेन व्हिसा ॲप्लिकेशन्ससाठी हे अनिवार्य आहे, अनुपालन सुनिश्चित करणे आणि यशस्वी व्हिसा मंजुरीची शक्यता वाढविणे अनिवार्य आहे.

5

प्रत्यावर्तन सहाय्य

गंभीर आजार, दुखापत किंवा दुर्दैवी घटनांमध्ये आपत्कालीन मायदेशी परत येण्यासाठी सपोर्ट प्रदान केला जातो. मायदेशी सुखरुप परतण्याची सुनिश्चिती प्राप्त होते.

6

ट्रिप कॅन्सलेशन संरक्षण

ट्रिप रद्द झाल्यास किंवा अनपेक्षित परिस्थितीमुळे व्यत्यय आल्यास खर्च कव्हर करते. अतिरिक्त फायनान्शियल ताणाशिवाय पुनर्निर्धारित प्रवासास अनुमती देते.

7

फॅमिली कव्हरेज पर्याय

अनेक पॉलिसींमध्ये कुटुंबातील सदस्यांना एकत्र प्रवास करणाऱ्या संपूर्ण गटाला कॉम्प्रिहेन्सिव्ह संरक्षण प्रदान करण्याचे पर्याय समाविष्ट आहेत.

8

मल्टी-कंट्री ॲक्सेस

एक पॉलिसी एकाधिक शेंगेन देशांमध्ये प्रवास कव्हर करते. ज्यामुळे शेंगेन झोनमध्ये भेट दिलेल्या प्रत्येक देशासाठी स्वतंत्र इन्श्युरन्सची गरज कमी होते.

9

पैशांचा योग्य विनियोग

विभिन्न कव्हरेज लेव्हल असूनही, शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑफर केलेल्या कव्हरेजसाठी उत्कृष्ट मूल्य प्रदान करते. ज्यामुळे प्रवाशांसाठी एक फायदेशीर गुंतवणूक बनते.

शेंगेन देश कोणते आहेत??

1985 मध्ये स्वाक्षरी केलेल्या शेंगेन कराराने अनिर्बंध हालचाली सुलभ करण्यासाठी 26 देशांचा समावेश असलेला युरोप अंतर्गत सीमा रहित क्षेत्राची निर्मिती केली आहे. या शेंगेन देशांमध्ये 22 युरोपियन युनियन (ईयू) सदस्य राज्य आणि चार बिगर-ईयू राष्ट्रांचा समावेश होतो.

अनु. क्र. देश तपशील
1.ऑस्ट्रियाएक नयनरम्य डेस्टिनेशन त्याच्या समृद्ध इतिहासासाठी, आश्चर्यकारक लँडस्केपसाठी आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते.
2.बेल्जियममध्ययुगीन शहरे, ब्रुसेल्स सारखी चैतन्यदायी शहरे आणि स्वादिष्ट चॉकलेट साठी प्रसिद्ध.
3.चेक रिपब्लिकप्रागचे घर, हे शहर अप्रतिम वास्तुकला आणि ऐतिहासिक आकर्षणासाठी प्रसिद्ध आहे.
4.डेन्मार्कवायकिंग इतिहास, परीकथेसारखे किल्ले आणि कोपनहेगन या सुंदर शहरासाठी प्रसिद्ध.
5.इस्टोनियामध्ययुगीन वास्तुकला आणि नयनरम्य लँडस्केपने वैशिष्ट्यीकृत असलेले मनमोहक बाल्टिक राज्य.
6.फिनलॅंडनॉर्दर्न लाइट्स, प्रिस्टिन तलाव आणि आधुनिक डिझाईन आणि टेक्नॉलॉजी साठी प्रसिद्ध.
7.फ्रान्सफॅशन, कला, वाईन आणि आयफेल टॉवर आणि लूव्र म्युझियम सारख्या महत्त्वाच्या लँडमार्क्स यासाठी ओळखले जाणारे ग्लोबल आयकॉन.
8.जर्मनीत्याचा इतिहास, बिअर संस्कृती, निसर्गरम्य लँडस्केप आणि बर्लिन सारख्या गजबजलेल्या शहरांसाठी ओळखले जाते.
9.ग्रीसप्राचीन इतिहासाचा समृद्ध वारसा, आश्चर्यकारक बेटे आणि एक्रोपोलिस सारखे आयकॉनिक लँडमार्क्स.
10.हंगेरीथर्मल बाथ, समृद्ध इतिहास आणि बुडापेस्ट या सुंदर शहरासाठी नामांकित.
11.इटलीकला, इतिहास, पाककृती आणि कोलोझियम आणि व्हेनिस कालवे यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांसाठी ख्यातकीर्त.
12.लात्व्हियासमृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैविध्यपूर्ण लँडस्केप सह एक मोहक बाल्टिक राज्य.
13.लिथुआनियात्याच्या मध्ययुगीन वास्तुकला, आकर्षक किनारपट्टी आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ख्यातकीर्त आहे.
14.लक्झेंबर्गसमृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नयनरम्य लँडस्केप असलेला एक छोटा पण मोहक देश.
15.लिस्टेस्टाइनपर्वतीय लँडस्केप आणि विलक्षण गावांसाठी प्रसिद्ध असलेली एक छोटी रियासत.
16.माल्टाप्राचीन इतिहास, आकर्षक किनारपट्टी आणि उत्साही संस्कृतीचा अभिमान बाळगणारे भूमध्यसागरीय रत्न.
17.नेदरलँडट्यूलिप फील्ड, पवनचक्क्या, नयनरम्य कालवे आणि ॲमस्टरडॅम सारख्या चैतन्यदायी शहरांसाठी प्रसिद्ध.
18.नॉर्वेफ्योर्ड, नॉर्दर्न लाईट्स आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध.
19.पोलंडमध्यकालीन आर्किटेक्चर, समृद्ध इतिहास आणि हृदयस्पर्शी पाककृतीसाठी ओळखले जाते.
20.पोर्तुगालआकर्षक समुद्रकिनारे, लिस्बन सारखी ऐतिहासिक शहरे आणि स्वादिष्ट पाककृती साठी ख्यातकीर्त डेस्टिनेशन्स.
21.स्लोवाकियानाट्यमय लँडस्केप, किल्ले आणि चैतन्यदायी राजधानी शहर ब्रातिस्लाव्हा यासाठी ख्यातकीर्त आहे.
22.स्लोवेनियाआश्चर्यकारक लँडस्केप, ऐतिहासिक शहरे आणि नैसर्गिक सौंदर्यासह एक लपलेले रत्न.
23.स्पेनविविध संस्कृती, सुंदर समुद्रकिनारे आणि बार्सिलोना आणि माद्रिद सारख्या व्हायब्रंट शहरांसाठी प्रसिद्ध.
24.स्वीडनत्याची रचना, नावीन्य, अप्रतिम लँडस्केप आणि मंत्रमुग्ध करणारे नॉर्थन लाईट्स यासाठी प्रसिद्ध.
25.स्वित्झर्लंडचित्तथरारक आल्प्स, चॉकलेट, घड्याळे आणि नयनरम्य शहरांसाठी नावाजलेले.

हे देश एकत्रितपणे शेंगेन क्षेत्र तयार करतात, प्रवाशांना विविध संस्कृती, लँडस्केप आणि इतिहास शोधण्याची संधी देतात. अंतर्गत सीमा तपासणीतून यामध्ये मुभा असते. या मोहक झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी शेंगेन व्हिसासाठी सिंगल ट्रॅव्हल इन्श्युरन्स आवश्यक आहे.

तुम्हाला माहित आहे?

शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही देशात प्रवेश करण्यासाठी वैध ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असणे अनिवार्य आहे.

शेंगेन व्हिसासह प्रवेशाची परवानगी असलेल्या राज्यांमध्ये प्रवास करण्यास कोण पात्र आहे?

सर्व भारतीय नागरिक तसेच इतर देशांतील नागरिक जे सध्या कायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करत आहेत ते भारतातील शेंगेन व्हिसासाठी अर्ज करू शकतात. सध्या इतरत्र राहणारे इतर भारतीय नागरिक भारतात शेंगेन व्हिसासाठी अर्ज करू शकतात जर ते भारतात कायदेशीररीत्या हजर असतील आणि ते राहत असलेल्या देशात सध्या राहत नसल्याचे वैध कारण देऊ शकल्यास.

शेंगेन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स आवश्यकता

शेंगेन व्हिसा ॲप्लिकेशन्सना शेंगेन व्हिसासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून विशिष्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य आहे. या कठोर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, इन्श्युरन्सला काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

1

वैधता कालावधी

शेंगेन क्षेत्रात इच्छित राहण्याच्या संपूर्ण कालावधीसाठी इन्श्युरन्स कव्हरेज वैध असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संभाव्य विस्तार कालावधीला कव्हर करणे आवश्यक आहे.

2

कव्हरेज रक्कम

वैद्यकीय कारणांसाठी प्रत्यावर्तन आणि त्वरित वैद्यकीय लक्ष यासह वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी पॉलिसीने किमान €30,000 किंवा भारतीय रुपयांमध्ये त्याच्या समतुल्य कव्हरेज प्रदान केले पाहिजे.

3

प्रादेशिक कव्हरेज

संपूर्ण झोनमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह संरक्षण सुनिश्चित करण्याद्वारे, इन्श्युरन्स कव्हरेजचा सर्व शेंगेन देशांपर्यंत विस्तार होणे महत्वपूर्ण आहे.

4

इन्श्युरन्स प्रदाता विश्वसनीयता

प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त प्रोव्हायडर कडून इन्श्युरन्सची निवड याद्वारे सुनिश्चित होते की पॉलिसी सर्व आवश्यक शेंगेन व्हिसा इन्श्युरन्स पूर्व-आवश्यकता पूर्ण करते, अपर्याप्त कव्हरेज किंवा पॉलिसी विसंगतीमुळे नाकारण्याचा धोका कमी होतो.

5

कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज

इन्श्युरन्स मध्ये विविध संभाव्य जोखमी समाविष्ट केल्या पाहिजेत. जसे की वैद्यकीय आणीबाणी, अपघात, प्रत्यावर्तन आणि दायित्वे तसेच प्रवास कालावधी दरम्यान कॉम्प्रिहेन्सिव्ह सुरक्षा जाळी प्रदान करणे.

 

शेंगेन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स म्हणजे काय?

शेंगेन व्हिसासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही एक विशेष इन्श्युरन्स पॉलिसी आहे. जी शेंगेन व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींसाठी शेंगेन झोनद्वारे निर्धारित विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. हा इन्श्युरन्स व्हिसा ॲप्लिकेशन प्रोसेससाठी महत्त्वपूर्ण पूर्व-आवश्यकता म्हणून काम करते. हे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज प्रदान करते. सहसा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, प्रत्यावर्तन आणि दायित्वे, शेंगेन क्षेत्रात प्रवाशांचे संपूर्ण रक्षण सुनिश्चित करते.

या इन्श्युरन्सच्या मुख्य घटकांमध्ये किमान €30,000 किंवा त्याहून अधिक कव्हरेज रक्कम, कोणतीही वजावट नाही आणि इच्छित मुक्कामाच्या संपूर्ण कालावधीची वैधता समाविष्ट आहे. हे कव्हरेज सर्व 26 शेंगेन देशांमध्ये विस्तारित आहे. प्रवास करताना अपघात किंवा आकस्मिक आजार यासारख्या अनपेक्षित परिस्थितींसापेक्ष सुरक्षिततेचे जाळे निर्माण करते. शेंगेन क्षेत्राचा शोध घेण्याचा इच्छुक असलेल्या भारतातील प्रवाशांनी हा इन्श्युरन्स व्हिसा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या युरोपियन प्रवासादरम्यान फायनान्शियल सुरक्षा आणि मनःशांती सुनिश्चित करण्यासाठी घेणे आवश्यक आहे.

buy a Traavel insurance plan

माफक ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या शोधात आहात का?

केवळ काही क्लिकमध्ये तुमच्या मनपसंत प्लॅनवर त्वरित कोट्स मिळवा!

शेंगेन व्हिसाचे प्रकार

शेंगेन क्षेत्र विविध प्रकारचे व्हिसा प्रदान करते, जे प्रत्येक विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत:

व्हिसाचे प्रकार विशिष्टता
लिमिटेड टेरोटेरियल व्हॅलिडिटी व्हिसा (एलटीव्ही)या व्हिसा द्वारे केवळ विशिष्ट शेंगेन देशात प्रवेशास अनुकूलता आहे. संपूर्ण शेंगेन क्षेत्रासाठी नाही. खरंतर आकस्मिक परिस्थिती किंवा तत्काळ मानवतावादी कारणांसाठी परवानगी बहाल केली जाते.
युनिफॉर्म शेंगेन व्हिसा (यूएसव्ही)

हा व्हिसा शेंगेन देशांमधील पर्यटन, बिझनेस किंवा कुटुंब भेटीसाठी 180-दिवसांच्या आत 90 दिवसांपर्यंत शॉर्ट-टर्म परवानगी देतो. तीन प्रकारच्या कॅटेगरी मध्ये वर्गीकृत केले जाते:

• टाईप ए: शेंगेन क्षेत्रात प्रवेश न करता शेंगेन विमानतळातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी एअरपोर्ट ट्रान्झिट व्हिसा.

• टाईप बी: जमीन किंवा समुद्राद्वारे शेंगेन प्रदेश ओलांडणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रान्झिट व्हिसा.

• टाईप सी: पर्यटन, बिझनेस किंवा कुटुंब/मित्रांना भेट देण्यासाठी रेग्युलर शॉर्ट-स्टे व्हिसा.

मल्टिपल एन्ट्री व्हिसानिर्दिष्ट कालावधीमध्ये शेंगेन क्षेत्रात एकाधिक वेळा प्रवेश आणि बाहेर पडण्यास प्रवाशांना सक्षम करते. बिझनेससाठी वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा शेंगेन राज्यांमध्ये सतत प्रवेश आवश्यक असलेल्यांसाठी आदर्श.
नॅशनल व्हिसा90 दिवसांपेक्षा जास्त दीर्घकालीन मुक्कामासाठी वैयक्तिक शेंगेन राज्यांद्वारे जारी केलेले. ते काम, अभ्यास, कौटुंबिक भेटी गाठी किंवा विशिष्ट देशातील इतर विशिष्ट कारणांसाठी तयार केले आहेत.
अधिकृत भेटीसाठी व्हिसासरकारी कामासाठी प्रवास करणाऱ्या किंवा शेंगेन देशांमधील सरकारी प्राधिकरणाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तींना मंजूर.

हे विभिन्न शेंगेन व्हिसा प्रकार समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक विशिष्ट उद्देश आणि शेंगेन क्षेत्रामध्ये राहण्याचा कालावधी पूर्ण करतो. विविध प्रवासाच्या गरजा आणि कालावधीसाठी लवचिकता प्रदान केल्या जातात.

शेंगेन व्हिसासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

शॉर्ट-टर्म शेंगेन व्हिसा ॲप्लिकेशनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स खालीलप्रमाणे:

सर्वसाधारण आवश्यकता:

• व्हिसा ॲप्लिकेशन फॉर्म: पूर्णपणे भरलेला आणि स्वाक्षरी केलेला.

• अलीकडील फोटो: विशिष्ट आवश्यकतांची पूर्तता करणारे दोन अलीकडील छायाचित्रे.

पासपोर्ट आणि प्रवासाची माहिती:

• राउंड ट्रिप प्रवासाचा कार्यक्रम: प्रवेश आणि निर्गमन फ्लाईट किंवा आरक्षणांचा तपशील, शेंगेनमध्ये प्रवासाची तारीख दर्शवितो.

• वैध पासपोर्ट: 10 वर्षांपेक्षा जुना नसावा. शेंगेन मधून उद्देशित निर्गमनाच्या पलीकडे किमान 3 महिन्यांसाठी वैध असावा.

फायनान्शियल आणि इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स:

• निवासाचा पुरावा: तुमच्या शेंगेन वास्तव्याची पुष्टी करणारे बुकिंग तपशील किंवा आमंत्रण.

• ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स: आपत्कालीन वैद्यकीय उपचारांसाठी €30,000 तरतूद, युरोप असिस्टन्स सारख्या प्रोव्हायडर कडून उपलब्ध.

• पेड व्हिसा शुल्क: प्रौढांसाठी €80, 6 ते 12 वयाच्या मुलांसाठी €45.

• फायनान्शियल म्हणजे पुरावा: ऑप्शनमध्ये बँक स्टेटमेंट, स्पॉन्सरशिप लेटर किंवा त्याचे कॉम्बिनेशन यांचा समावेश होतो.

रोजगार आणि विशिष्ट परिस्थिती:

• स्वयं-रोजगारितांसाठी: बिझनेस लायसन्स, कंपनी बँक स्टेटमेंट्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स.

• कर्मचाऱ्यांसाठी: रोजगार करार, बँक स्टेटमेंट, रजा परवानगी आणि प्राप्तिकर संबंधित डॉक्युमेंट्स.

• विद्यार्थ्यांसाठी: शाळा/विद्यापीठाकडून नावनोंदणी पुरावा आणि ना-हरकत पत्र.

• अल्पवयीनांसाठी: जन्म प्रमाणपत्र, दोन्ही पालकांद्वारे स्वाक्षरी केलेले ॲप्लिकेशन, फॅमिली कोर्ट ऑर्डर (लागू असल्यास), पालकांचा ID/पासपोर्ट कॉपी आणि केवळ एकट्याने प्रवास करणाऱ्या अल्पवयीनांसाठी पालकांचे योग्यरित्या नोटरीकृत अधिकृत पत्र.

• ईयू नागरिकांशी विवाहित बेरोजगारांसाठी: जोडीदाराकडून नोकरीची पुष्टी, विवाह प्रमाणपत्र आणि जोडीदाराचा पासपोर्ट.

• निवृत्त व्यक्तींसाठी: मागील 6 महिन्यांचे पेन्शन स्टेटमेंट.

तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार सर्व आवश्यक डॉक्युमेंट्सची खात्री केल्यानंतर शेंगेन व्हिसा ॲप्लिकेशन यशस्वी होण्याच्या शक्यतेत अधिक वाढ होते.

शेंगेन व्हिसाची नेमकी प्रोसेस काय आहे?

शेंगेन व्हिसा ॲप्लिकेशन प्रोसेस शेंगेन क्षेत्रात अखंड प्रवास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने संरचित प्रक्रियेचे अनुसरण करते:

• भेटीच्या उद्देश आणि कालावधीवर आधारित योग्य व्हिसा प्रकार ओळखा (पर्यटन, बिझनेस, कुटुंब भेट इ.).

• शेंगेन देशाचा दूतावास किंवा वाणिज्य दूतावास निवडा. जिथे ॲप्लिकेशन दाखल केले जाईल. हे सहसा प्राथमिक गंतव्यस्थान किंवा सर्वात लांब मुक्कामाचा देश असतो.

• सर्व आवश्यक डॉक्युमेंट्सची पूर्तता करा जसे की, परिपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म, पासपोर्ट, फोटो, प्रवासाचा कार्यक्रम, हेल्थ इन्श्युरन्स, फायनान्शियल पुरावे आणि रोजगार, विद्यार्थी स्टेटस किंवा इतर परिस्थितींवर आधारित विशिष्ट डॉक्युमेंट्स.

• व्हिसा सबमिशनसाठी निवडलेल्या दूतावास/वाणिज्य दूतावासात भेटीची वेळ निश्चित करा. काही लोकेशनसाठी पूर्वीच्या अपॉईंटमेंट बुकिंगची आवश्यकता असू शकते.

• अपॉईंटमेंट वेळी उपस्थित राहा किंवा बायोमेट्रिक डाटा (जर आवश्यक असल्यास) आणि व्हिसा फी अदा करण्याद्वारे प्रत्यक्ष ॲप्लिकेशन सादर करा.

• ॲप्लिकेशनवर प्रोसेस करण्यासाठी दूतावास/ वाणिज्य दूतावासास वेळ द्या. प्रोसेसिंग कालावधीत बदल होऊ शकतो. परंतु त्यासाठी 15दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो.

• व्हिसा ॲप्लिकेशनवर निर्णय प्राप्त करा. मंजुरी दिली जाऊ शकते किंवा नाकारले जाऊ शकते किंवा अतिरिक्त डॉक्युमेंटेशनची विनंती केली जाऊ शकते.

• मंजूरी मिळाल्यावर, दूतावास/वाणिज्य दूतावास किंवा नियुक्त कुरियर सर्व्हिस द्वारे जारी केलेल्या व्हिसासह पासपोर्ट संकलित करा.

• व्हिसा प्राप्त झाल्यानंतर, शेंगेन देशात मुक्तपणे प्रवास करा. मात्र, व्हिसा अटींच्या बाबतीत असलेले निवास कालावधी, उद्देश आणि अन्य नियम यांचे पालन करा.

ही पद्धतशीर प्रोसेस शेंगेन नियमांचे पालन सुनिश्चित करते आणि वैविध्यपूर्ण आणि मनमोहक शेंगेन क्षेत्राची भ्रमंती करणाऱ्या प्रवाशांना त्रासमुक्त अनुभव प्रदान करते.

शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी द्वारे काय कव्हर केले जाते?

एचडीएफसी एर्गो द्वारे त्यांच्या शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीसाठी ऑफर केलेले कव्हरेज खालील प्रमाणे:

Accommodation and Trip Cancellation

ट्रिप कॅन्सलेशन

निवास, उपक्रम आणि अनपेक्षित ट्रिपच्या रद्दतेच्या स्थितीत नॉन-रिफंडेबल खर्चाची प्रतिपूर्ती.

Emergency dental expenses coverage by HDFC ERGO Travel Insurance

फ्लाईट संबंधित प्रतिपूर्ती

चुकलेले कनेक्शन्स, हायजॅक डिस्ट्रेस, फ्लाईट डीले, कॅन्सलेशन्स आणि ट्रिप कर्टेलमेंट कव्हर करते.

Personal Accident

आपत्कालीन वैद्यकीय खर्च

हॉस्पिटलायझेशन, OPD उपचार, रुग्णवाहिका खर्च आणि वैद्यकीय स्थलांतरण कव्हर करते.

Personal Accident : Common Carrier

दातांचा खर्च

पॉलिसीच्या अटींच्या अधीन असलेल्या प्रवासादरम्यान दातांची निगा समाविष्ट आहे.

Hospital cash - accident & illness

वैयक्तिक अपघात कव्हरेज

अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी अपंगत्वाच्या बाबतीत इन्श्युअर्डच्या कुटुंबाला फायनान्शियल सहाय्य प्रदान करते.

Hospital cash - accident & illness

आपत्कालीन कॅश सहाय्य

प्रवासादरम्यान चोरी किंवा दरोड्यामुळे भारतातून फंड ट्रान्सफर सुलभ करते.

Hospital cash - accident & illness

सामान आणि सामग्री कव्हरेज

चोरीला गेलेल्या किंवा विलंबित सामानासाठी प्रतिपूर्ती, यामुळे तुमची ट्रिप सुरळीतपणे सुरू ठेवण्याची खात्री करते.

Hospital cash - accident & illness

पर्सनल लायबिलिटी

परदेशात थर्ड-पार्टीच्या नुकसानीची भरपाई देण्यास मदत करते.

Hospital cash - accident & illness

हॉस्पिटल कॅश आणि डॉक्युमेंट्सचे नुकसान

हॉस्पिटल मुक्कामासाठी दैनंदिन भत्ता दिला जातो आणि पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सारख्या गहाळ डॉक्युमेंट्स साठी खर्चाची तरतूद केली जाते.

Hospital cash - accident & illness

कॉमन कॅरियर अपघात

कॉमन कॅरियरचा वापर करताना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास एकरकमी पेआऊट प्रदान केले जाते.

शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये काय कव्हर होत नाही?

शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत खालील घटक हे कव्हर केले जात नाही:

Breach of Law

कायद्याचा भंग किंवा युद्ध

आरोग्य समस्या किंवा युद्धात सहभागी झाल्यामुळे किंवा कायदेशीर उल्लंघनास कारणीभूत बेकायदेशीर कृतीमुळे उद्भवणारे आजार इन्श्युरन्स प्लॅन मध्ये समाविष्ट नाहीत.

Consumption Of Intoxicant Substances not covered by HDFC ERGO Travel Insurance

मादक पदार्थांचे सेवन

मादक पदार्थांच्या सेवनामुळे किंवा प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे उद्भवणारे कोणतेही क्लेम पॉलिसीअंतर्गत स्वीकारले जात नाहीत.

Pre Existing Diseases not covered by HDFC ERGO Travel Insurance

पूर्व-विद्यमान आजार

इन्श्युअर्ड प्रवासाच्या कालावधीपूर्वी अस्तित्वात असलेल्या आजारांशी संबंधित उपचारांचा खर्च कव्हर केला जात नाही, ज्यामध्ये पूर्व-विद्यमान परिस्थितीची वैद्यकीय काळजी समाविष्ट आहे.

Cosmetic And Obesity Treatment not covered by HDFC ERGO Travel Insurance

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणावरील उपचार

इन्श्युअर्ड प्रवासादरम्यान कॉस्मेटिक किंवा लठ्ठपणाशी संबंधित उपचारांसाठी झालेला कोणताही खर्च पॉलिसीद्वारे कव्हर केला जात नाही.

Self Inflicted Injury not covered by HDFC ERGO Travel Insurance

स्वत: करून घेतलेली दुखापत

स्व-हेतूने केलेल्या दुखापतीच्या स्थितीत हॉस्पिटलायझेशन किंवा वैद्यकीय खर्चास इन्श्युरन्स कव्हरेज मध्ये समाविष्ट केले जात नाही.

Adventure Sports Incidents

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स घटना

एक्स्ट्रीम किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागामुळे होणारे इजा किंवा वैद्यकीय खर्च कव्हर केले जात नाहीत.

Non-Medical Evacuation

बिगर-वैद्यकीय निर्वासन

युद्ध क्षेत्र किंवा संघर्ष क्षेत्रातून बिगर-वैद्यकीय निर्वासन संबंधित खर्च कव्हरेजचा भाग नाहीत.

High-Risk Activities

हाय-रिस्क कृती

स्कायडायव्हिंग किंवा पर्वतारोहण यासारख्या जास्त जोखीम असलेल्या कृती मुळे घडणाऱ्या घटनांना पॉलिसी कव्हरेजमधून वगळले जाते.

Non-Compliant Medical Care

नॉन-कम्प्लायंट मेडिकल केअर

पॉलिसीच्या अटी व शर्तींचे पालन करत नसलेल्या वैद्यकीय सेवेच्या खर्चाची परतफेड केली जात नाही.

भारत किंवा इतर कोणत्याही बिगर-शेंगेन देशामधील शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत शेंगेन क्षेत्रातील प्रवासादरम्यान कोणताही गैरसमज किंवा अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी सर्व बाबी समजून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्सचे सखोल पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे.

एचडीएफसी एर्गोच का?

तुम्ही तुमच्या शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी एचडीएफसी एर्गो का निवडावा याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

24/7 सपोर्ट: आम्ही पूर्णवेळ कस्टमर केअर सपोर्ट आणि जलद क्लेम मंजुरी, आव्हानात्मक काळात सर्वांगीण सपोर्ट प्रदान करण्याद्वारे आम्ही मन:शांती प्रदान करतो.

लाखो सुरक्षित: एचडीएफसी एर्गो वर, आम्ही 1 कोटींहून अधिक चेहऱ्यांवर स्मित हास्य खुलविले आहे. विश्वासार्ह आणि माफक इन्श्युरन्स उपाय सातत्याने वितरीत करून नव्याने नाते संबंधाची व्याख्या निर्मिली आहे.

आरोग्य तपासणी नाही: तुमची पॉलिसी प्राप्त करण्यापूर्वी कोणत्याही आरोग्य तपासणीशिवाय त्रासमुक्त एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सचा आनंद घ्या.

पेपरलेस सुविधा: डिजिटल जगाचा स्वीकार करण्याद्वारे आम्ही किमान डॉक्युमेंटेशन सह ऑनलाइन पॉलिसी जारी करण्याची प्रोसेस ऑफर करतो. जेणेकरुन तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होत असल्याची खात्री मिळते.

एचडीएफसी एर्गोमध्ये, आम्ही भारतातील शेंगेन व्हिसा इन्श्युरन्स शोधणाऱ्या व्यक्तींसह विविध प्रवासी गरजांसाठी तयार केलेल्या इन्श्युरन्स अनुभवाला पुनर्निर्धारित करण्याचा प्रयत्न करतो.

सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या देशांसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स

खालील पर्यायांमधून तुमची निवड करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या परदेशी ट्रिपसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकता

देशांची यादी जेथे ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य आहे

my:health medisure super top-up plan

शेंगेन देश

  • फ्रान्स
  • स्पेन
  • बेल्जियम
  • ऑस्ट्रिया
  • इटली
  • स्वीडन
  • लिथुआनिया
  • जर्मनी
  • नेदरलँड्स
  • पोलंड
  • फिनलॅंड
  • नॉर्वे
  • माल्टा
  • पोर्तुगाल
  • स्वित्झर्लंड
  • इस्टोनिया
  • डेन्मार्क
  • ग्रीस
  • आइसलँड
  • स्लोवाकिया
  • झेकिया
  • हंगेरी
  • लात्व्हिया
  • स्लोवेनिया
  • लिकटेंस्टाईन आणि लक्झेंबर्ग
my:health medisure super top-up plan

इतर देश

  • क्यूबा
  • इक्वाडोर
  • इराण
  • टर्की
  • मोरोक्को
  • थायलँड
  • संयुक्त अरब अमीराती
  • टोगे
  • अल्जेरिया
  • रोमॅनिया
  • क्रोएशिया
  • मोल्दोवा
  • जॉर्जिया
  • अरुबा
  • कंबोडिया
  • लेबनॉन
  • सिशेल्स
  • अंटार्क्टिका

स्त्रोत: VisaGuide.World

वाचा नवीनतम ट्रॅव्हल इन्श्युरन्स ब्लॉग्स

visa-free-honeymoon-destination

व्हॅलेंटाईन डे 2023: तुम्हाला व्हिसाची गरज लागणार नाही अशी 9 हनिमून डेस्टिनेशन्स

अधिक वाचा
08 फेब्रुवारी, 2023 रोजी प्रकाशित
sharing-medical-history-with-travel-insurance-provider

तुमचा वैद्यकीय रेकॉर्ड तुमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्रोव्हायडर सोबत शेअर करण्याचे लाभ

अधिक वाचा
08 फेब्रुवारी, 2023 रोजी प्रकाशित
How to select a dependable travel health insurance?

विश्वासार्ह ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स कसा निवडावा?

अधिक वाचा
01 फेब्रुवारी, 2023 रोजी प्रकाशित
A Comprehensive travel guide for Singapore

सिंगापूरसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅव्हल गाईड

अधिक वाचा
13 फेब्रुवारी, 2023 रोजी प्रकाशित

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

हे तुमच्या व्हिसा ॲप्लिकेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे नियोजित केल्यास कोणत्याही एक्सटेंशनसह शेंगेन क्षेत्रात तुमच्या इच्छित राहण्याचा संपूर्ण कालावधी कव्हर करणे आवश्यक आहे.

सामान्यपणे, नाही. पॉलिसीच्या अटींमध्ये स्पष्टपणे नमूद केल्याशिवाय बहुतांश पॉलिसी पूर्व-विद्यमान वैद्यकीय स्थितीशी संबंधित खर्च कव्हर करत नाहीत.

पूर्णपणे, भारतातील विविध इन्श्युरन्स प्रदाते शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी ऑफर करतात जे शेंगेन व्हिसा प्राप्त करण्यासाठी आवश्यकता पूर्ण करतात.

शेंगेन व्हिसा आवश्यकतांनुसार पॉलिसीमध्ये किमान € 30,000 किंवा भारतीय रुपयांच्या समतुल्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी कव्हरेज असणे आवश्यक आहे.

तुमच्याकडे इतर ट्रॅव्हल इन्श्युरन्स असले तरीही विशिष्ट शेंगेन ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे. शेंगेन क्षेत्रासाठी पॉलिसी स्पष्टपणे कव्हरेज नमूद केल्याची खात्री करा.

तुमची ट्रिप सुरू होण्यापूर्वी इन्श्युरन्स खरेदी करण्याची शिफारस केली जाते. तथापि, काही प्रोव्हायडर आगमनानंतर कव्हरेज खरेदी करण्यासाठी किंवा विस्तारित करण्यासाठी पर्याय देऊ शकतात. परंतु त्या पूर्वीच प्रोसेस करण्याचा सल्ला दिला जातो.

सामान्यपणे, स्टँडर्ड पॉलिसीमध्ये हाय-रिस्क उपक्रमांसाठी कव्हरेज वगळले जाऊ शकते. जर अशा उपक्रमांचे नियोजन करत असाल तर आवश्यक असल्यास अतिरिक्त कव्हरेज तपासणे आणि निवडणे शहाणपणाचे आहे.

अवॉर्ड्स आणि मान्यता

Image

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

Image

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

Image

iAAA रेटिंग

Image

ISO सर्टिफिकेशन

Image

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

Scroll Right
Scroll Left
सर्व अवॉर्ड्स पाहा
Buy Travel Insurance Plan Online From HDFC ERGO

वाचन पूर्ण झाले? ट्रॅव्हल प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?