अनेक विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हे एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखे असते कारण ते त्यांच्या करिअरमध्ये स्थान शोधण्यासाठी आणि तयार करण्यासाठी लाखो संधीचे दरवाजे उघडते. हा जीवन-बदलणारा निर्णय आहे आणि जीवनासाठी अनेक अपेक्षा, मजा आणि अनुभवाचे धडे आणतो. तथापि, कुटुंब आणि मित्रांना मागे सोडून आपल्या करिअरसाठी दूरच्या देशात राहणे सोपे नाही. सर्व आनंद आणि जबाबदारीसह वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, अभ्यासात व्यत्यय, डॉक्युमेंट्स हरवणे किंवा इतर दुर्दैवी घटनांसारख्या जोखीमा योग्य प्रमाणात येतात. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमचा मुक्काम सुरक्षित करण्यासाठी स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी मिळवणे आवश्यक आहे.
त्यामुळे, जर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे असेल तर योग्य इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला तुमच्या मुक्कामात व्यत्यय येऊ शकणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार होण्यास मदत करू शकते. स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी हा अपरिचित देशात तुमच्या मुक्कामासाठी कव्हरेज मिळवण्याचा एक सोपा आणि परवडणारा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही घरापासून हजारो मैल दूर असाल, तेव्हाही तुम्हाला मनःशांती मिळते की, समस्या निर्माण झाली तरी तुमच्याकडे असे कोणीतरी आहे ज्यावर तुम्ही अवलंबून राहू शकता.
त्यामुळे, एकदा तुम्ही प्रोग्राम, विद्यापीठ आणि तुमच्या आवडीचे देश शॉर्टलिस्ट केल्यानंतर, तुमच्या मुक्कामादरम्यान तुम्हाला आवश्यक सपोर्ट देण्यासाठी योग्य स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी निवडा. एचडीएफसी एर्गो स्टुडंट ओव्हरसीज ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन ऑफर करते, जो अखंडपणे वैद्यकीय खर्च, मुक्कामातील व्यत्यय सामानाशी संबंधित आणि प्रवासाशी संबंधित जोखीम कव्हर करतो.
चला तुमच्या स्टुडंट ट्रॅव्हल प्लॅनसह तुम्ही अपेक्षित करू शकणारे काही लाभ पाहूया:
तुम्हाला हॉस्पिटलायझेशन, रुम भाडे, OPD उपचार आणि रोड ॲम्ब्युलन्स खर्चासाठी कव्हर केले जाते. आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर, वैद्यकीय प्रत्यावर्तन आणि मृत शरीराच्या प्रत्यावर्तन यावरील खर्चाची देखील परतफेड केली जाते.
परदेशात असताना तुमच्यामुळे थर्ड पार्टीला नुकसान झाल्यास ते भयावह असू शकते. काळजी नसावी, तुमची पॉलिसी तुम्हाला सेव्ह करेल.
जर तुमचे चेक-इन केलेले सामान हरवले तर ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपनी तुम्हाला भरपाई देईल जेणेकरून तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स खराब होणार नाहीत
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत जेथे स्थानिक उपचार पुरेसे नाहीत, आम्ही आपत्कालीन स्थलांतरासाठी कव्हरेज प्रदान करतो. हवाई किंवा रस्ते वाहतुकीद्वारे असो, आम्ही सुनिश्चित करतो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशात पोहोचता.
घरी पालकांसाठी अशी खात्री की त्यांच्या मुलांना जेव्हा गरज भासेल तेव्हा कोणीतरी ओळखीचे असणार आहे.
जेव्हा तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याची योजना बनवता, तेव्हा इंटरनॅशनल स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही चुकवू शकत नाही. का असा प्रश्न पडत आहे? वाचा:
स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स फायनान्शियल सुरक्षा कवच म्हणून कार्य करत असताना, अनेक देशांमध्ये परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनिवार्य आवश्यकता आहे. तुम्हाला व्हिसासाठी पात्र होण्यासाठी त्याची आवश्यकता असू शकते.
परदेशात हेल्थकेअर महाग आहे, साधी डॉक्टरांची भेट देखील तुम्हाला खर्चात ढकलू शकते. योग्य ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये वैद्यकीय खर्च, हॉस्पिटलायझेशन आणि आपत्कालीन स्थलांतर देखील कव्हर केले जाते. हे सुनिश्चित करते की अनपेक्षित आरोग्य समस्यांमुळे विद्यार्थ्यांवर भार पडत नाही.
आंतरराष्ट्रीय प्रवास म्हटला तर अनेक समस्या या येतच असतात. फ्लाईट विलंब, सामान हरवणे किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. ट्रॅव्हल इन्श्युरन्स आर्थिक भरपाई प्रदान करते, ज्यामुळे तुम्हाला अशा परिस्थिती सहजपणे हाताळण्यास मदत होते.
कौटुंबिक संकट किंवा आरोग्य समस्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत, अभ्यासात व्यत्यय आल्यास इन्श्युरन्स आगाऊ भरलेल्या तुमच्या ट्यूशन फीची परतफेड करते.
अपघात, कायदेशीर समस्या किंवा आपत्कालीन परिस्थितीमुळे अभ्यासातील व्यत्यय यासारख्या अनपेक्षित घटना तुमचे प्लॅन्स खराब करू शकतात. योग्य इंटरनॅशनल स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीसह तुम्हाला या आकस्मिक घटनांना कव्हर मिळेल.
भारतातील पालक व अन्य कुटुंब सदस्य खात्री बाळगू शकतात की परदेशात देखील त्यांच्या मुलाला या अनपेक्षित घटनांपासून संरक्षण प्रदान करण्यास कोणीतरी आहे.
परदेशात शिक्षण घेणे हे एक आकर्षक ॲडव्हेंचर आहे, परंतु अनपेक्षित आरोग्य समस्या त्वरित आर्थिक तणावात बदलू शकतात. जर तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असलेला अचानक आजार किंवा अपघात झाला तर आमचा स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला आमच्या हॉस्पिटल्सच्या विस्तृत नेटवर्कवर कॅशलेस वैद्यकीय उपचार प्राप्त करण्याची खात्री देतो.
दातांचे दुखणे अचानक आणि उत्तेजक असू शकते, ज्यामुळे तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. जर तुमच्या दातांना दुखापत झाली असेल किंवा तीव्र दातांच्या वेदनेचा अनुभव आला तर आमचा प्लॅन आवश्यक दातांच्या उपचारांचा खर्च कव्हर करतो, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता न करता आत्मविश्वासाने परिस्थितीस सामोरे जाता येईल.
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत जेथे स्थानिक उपचार पुरेसे नाहीत, आम्ही आपत्कालीन स्थलांतरासाठी कव्हरेज प्रदान करतो. हवाई किंवा रस्ते वाहतुकीद्वारे असो, आम्ही सुनिश्चित करतो की तुम्ही जवळच्या वैद्यकीय सुविधेपर्यंत पोहोचता.
विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेमध्ये, आम्ही मृतदेह त्यांच्या देशात परत आणण्याशी संबंधित खर्चाची काळजी घेतो.
जर दुर्दैवी अपघातामुळे जीवन गमावले तर आमचा इंटरनॅशनल स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स नॉमिनीला लंपसम भरपाई प्रदान करतो. हे अशा दुर्दैवी परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते.
जर अपघातामुळे कायमस्वरुपी अपंगत्व आले तर आम्ही आर्थिक भार कमी करण्यास मदत करण्यासाठी लंपसम पेआऊट प्रदान करतो.
अपघात होतात आणि कधीकधी, तुम्ही अनपेक्षितपणे थर्ड-पार्टी प्रॉपर्टीचे नुकसान करू शकता किंवा अपघातासाठी जबाबदार असू शकता.
जर तुम्हाला जामीनपात्र गुन्ह्यासाठी अटक केली किंवा ताब्यात घेतले असेल तर आम्ही जामीन रक्कम कव्हर करण्यासाठी पाऊल उचलतो, ज्यामुळे तुम्हाला कायदेशीर अडचणी सहजपणे सोडवण्यास मदत होते.
जर तुमच्या शैक्षणिक प्रायोजकांचा अकालीन मृत्यू झाला तर आम्ही उर्वरित ट्यूशन फीसाठी रिएम्बर्समेंट प्रदान करतो.
तुमचे शिक्षण ही एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशन किंवा कुटुंबातील सदस्याचे निधन तुमच्या अभ्यासात व्यत्यय आणू शकते. अशा प्रकरणांमध्ये आमची पॉलिसी ट्यूशन फी रिफंड करते.
अधिकच्या कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होणे भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सात दिवसांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले असेल तर आम्ही तुम्हाला भेट देण्यासाठी कुटुंबातील सदस्याचा प्रवास खर्च कव्हर करतो.
पासपोर्ट सारखे महत्त्वाचे डॉक्युमेंट गमावणे एक दुःस्वप्न असू शकते. आमचा इन्श्युरन्स नवीन पासपोर्ट प्राप्त करण्याचा खर्च कव्हर करतो, जेणेकरून तुम्ही अनावश्यक विलंबाशिवाय तुमचे शिक्षण सुरू ठेवू शकता.
परदेशात तुमचे सामान हरवणे अत्यंत निराशाजनक असू शकते. आम्ही सुनिश्चित करू की तुम्हाला नुकसानीसाठी भरपाई दिली जाईल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे महत्त्वाचे सामान बदलण्याची अनुमती मिळेल.
जर तुमच्या सामानाला विलंब झाला तर तुम्हाला कोणतेही नियोजन न करता अभ्यास सुरू करण्याची गरज नाही. आम्ही आपत्कालीन आवश्यक गोष्टींचा खर्च कव्हर करतो, जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या क्लासमध्ये उपस्थित राहू शकता.
आमच्या काही ट्रॅव्हल प्लॅन्समध्ये वर नमूद केलेले कव्हरेज उपलब्ध नसतील. कृपया आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन विषयी अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी मजकूर, ब्रोशर आणि प्रॉस्पेक्टस वाचा.
जर बेकायदेशीर उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे किंवा युद्धाशी संबंधित घटनेमुळे आजार किंवा दुखापत झाली तर आमची पॉलिसी वैद्यकीय खर्च कव्हर करत नाही.
जर तुम्हाला अंमली पदार्थांच्या वापरामुळे वैद्यकीय सहाय्य आवश्यक असेल तर तुमचा क्लेम या पॉलिसी अंतर्गत विचारात घेतला जाणार नाही.
स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स सामान्यपणे पूर्व-विद्यमान आजारांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांसाठी कव्हरेज वाढवत नाही. प्रवास सुरू करण्यापूर्वी विद्यमान वैद्यकीय स्थितींसाठी स्वतंत्र कव्हरेज पर्याय तपासण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो.
कॉस्मेटिक सर्जरी आणि लठ्ठपणावरील उपचार यासारख्या निवडक प्रोसेस आमच्या पॉलिसी अंतर्गत येत नाहीत.
मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे आणि जर तुम्ही संघर्ष करत असाल तर व्यावसायिक मदत मिळवण्यासाठी अत्यंत प्रोत्साहित केले जाते. तथापि, स्वत:ला हानी किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे होणारा कोणताही वैद्यकीय खर्च पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जात नाही.
जर तुम्हाला एक्स्ट्रीम किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना दुखापत झाली तर पॉलिसी वैद्यकीय उपचारांसाठी फायनान्शियल कव्हरेज प्रदान करणार नाही.
परदेशात शिक्षण घेणे हे आयुष्यभराचे साहस आहे. हे स्वत:च्या अनिश्चिततेसह देखील येते. त्यामुळे, परदेशात जाताना, तुम्हाला सर्वाधिक मागणी असलेल्या स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये इन्व्हेस्ट करावेसे वाटते. आणि का नाही, अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून तुम्हाला सुरक्षित ठेवण्यापासून ते तुमच्या वैयक्तिक सामानाला कव्हर करण्यापर्यंत, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज तुम्हाला अनपेक्षित अडथळ्यांशिवाय तुमचे शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते.
एचडीएफसी एर्गो तुमच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केलेले स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स ऑफर करते. आमचा विश्वास आहे की जर आधीच सर्व नियोजित असल्यास सुरळीत शैक्षणिक प्रवास आणि महागडी सुव्यवस्था यात ताळमेळ सांभाळता येतो! तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्सचा विचार का करावा हे येथे दिले आहे:
प्रमुख वैशिष्ट्ये | लाभ |
---|---|
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज | परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध जोखीमांसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्सची रचना केली गेली आहे. |
वैद्यकीय कव्हरेज | स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनपेक्षित आरोग्य समस्या किंवा अपघातांच्या बाबतीत निदान चाचण्या, हॉस्पिटलायझेशन आणि दंत उपचारांना देखील कव्हर करते. |
पर्सनल लायबिलिटी | थर्ड-पार्टी प्रॉपर्टीचे अपघाती नुकसान किंवा इतरांना दुखापत करणे महत्त्वाच्या फायनान्शियल लायबिलिटीज निर्माण करू शकतात. |
पासपोर्ट आणि चेक-इन केलेले सामान हरवणे | जर तुमचे सामान किंवा पासपोर्ट हरवले किंवा विलंब झाला तर इन्श्युरन्स प्लॅन आवश्यक रिप्लेसमेंटचा खर्च कव्हर करतो. |
आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबाची भेट | तुम्ही परदेशात आहात व तुमचे आरोग्य ठीक नसल्यास ते शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या कठीण असू शकते. अशा वेळी, जेव्हा इन्श्युअर्डला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते तेव्हा सहानुभूतीपूर्ण भेटीची भरपाई दिली जाते. |
अभ्यासात कोणतेही व्यत्यय नाही | कौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणांमुळे तुमच्या अभ्यासात व्यत्यय आल्यास तुमची स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला सुरक्षित करेल. |
परदेशात शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या प्रत्येक महत्वाकांक्षी विद्यार्थ्यासाठी स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स इंडिया महत्त्वाची भूमिका बजावते.
1. जेव्हा ज्या देशात तुम्हाला जायचे आहे तिथे हे अनिवार्य असते
बहुतांश देशांमध्ये, परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे अनेकदा आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, काही विद्यापीठांना त्यांच्या नावनोंदणी निकषाचा भाग म्हणून वैद्यकीय कव्हरेजसाठी इन्श्युरन्सचा पुरावा आवश्यक आहे.
2. जेव्हा तुम्हाला प्रवास कव्हर करायचा असतो
प्रवास करताना, तुम्ही तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विलंब किंवा सामान हरवणे यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला सुरुवातीपासून या अडथळ्यांसाठी कव्हर करण्याची खात्री देते.
3. जेव्हा तुमचे शिक्षण विस्कळीत होते
आजार, राजकीय अस्थिरता किंवा कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती यासारख्या अनपेक्षित घटना तुम्हाला तुमच्या शिक्षणात व्यत्यय आणू शकतात. योग्य प्रकारचा इन्श्युरन्स न वापरलेल्या ट्यूशन फीसाठी भरपाई प्रदान करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला परिस्थिती सहजपणे पार पाडण्यास मदत होते.
4. जेव्हा तुम्हाला कायदेशीर समस्या व्यवस्थित हाताळायच्या असतात
परदेशात खटला एक दुःस्वप्न असू शकतो. थर्ड पार्टीला अपघाती नुकसानीसाठी कायदेशीर दायित्वाच्या बाबतीत, तुमचा स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स बचावासाठी येतो.
5. जेव्हा तुम्हाला पालकांसाठी मनःशांती सुनिश्चित करायची असते
ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनपेक्षित परिस्थितीच्या बाबतीत फायनान्शियल सुरक्षा प्रदान करते आणि पालकांना खात्री असते की जर गोष्टी कठीण झाल्यास, त्यांच्या मुलाची काळजी घेतली जाईल.
सोप्या भाषेत सांगायचे तर, परदेशात तुमच्या शैक्षणिक प्रवासादरम्यान फायनान्शियल किंवा शारीरिक जोखीम असण्याची शक्यता असताना भारतातून स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे.
तुमचा अद्याप इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ठिकाणी तुमचे उच्च शिक्षण घेण्याचा मानस असल्यास, तुम्हाला त्या ठिकाणाचा माहितीपूर्ण निर्णय घ्यावा लागेल. तसेच, लक्षात ठेवा की जगभरातील बहुतांश महाविद्यालये आणि विद्यापीठांनी स्टुडंट मेडिकल ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य केला आहे.
अमेरिकन स्वप्न जगायचे आहे का? असे असल्यास अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणे नक्कीच तुमच्या यादीत असेल. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि शिकागो युनिव्हर्सिटी सारख्या संस्था तुमचे शैक्षणिक तसेच करिअर साठी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म प्रदान करतात.
जर्मनीतील अनेक विद्यापीठे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहेत. इतर अनेक देशांच्या तुलनेत, जर्मनी अधिक परवडणारे शैक्षणिक कार्यक्रम आणि व्यावसायिक संधी प्रदान करते.
स्पेनला खरोखरच उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी एक उत्तम पर्याय मानले जाते. अष्टपैलू आणि परवडणाऱ्या कार्यक्रमांसाठी ओळखले जाणारे, युनिव्हर्सिटेट ऑटोनोमा डी बार्सिलोना, युनिव्हर्सिटेट डी बार्सिलोना आणि माद्रिद कॉम्प्ल्यूटेन्स युनिव्हर्सिटी यासारख्या संस्था अनेकांसाठी आकर्षक पर्याय आहेत.
मेलबर्न युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी आणि सिडनी युनिव्हर्सिटी यासारख्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी त्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रम आणि शिक्षणानंतरच्या प्लेसमेंटसाठी ओळखल्या जातात. ऑस्ट्रेलिया बहुसांस्कृतिक वातावरण ऑफर करते आणि त्याची व्हिसा पॉलिसी खूपच अनुकूल आहेत.
यूके दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र राहिले आहे. ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि एडिनबर्ग युनिव्हर्सिटी यासारख्या जागतिक दर्जाच्या युनिव्हर्सिटी भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वप्नातील अभ्यास गंतव्ये आहेत.
सिंगापूर तुम्हाला समृद्ध सांस्कृतिक अनुभवांसह उत्कृष्ट शिक्षणाचे मिश्रण ऑफर करते. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हे काही लोकप्रिय पर्याय आहेत.
जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी अप्लाय करता तेव्हा तुम्हाला फॉलो करणे आवश्यक असलेले सोपे आणि सरळ पात्रता निकष आहेत. सामान्यपणे, 16 आणि 35 वर्षांदरम्यान वयोगटातील भारतीय विद्यार्थी स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्यास पात्र आहेत. तुम्ही निवडलेल्या प्लॅनच्या प्रकारानुसार, पॉलिसीचा कालावधी 30 दिवस ते 2 वर्षांदरम्यान असू शकतो. बहुतांश प्रकरणांमध्ये, तुम्ही इंटरनॅशनल स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्यापूर्वी कोणतीही प्री-पॉलिसी वैद्यकीय चाचणी आवश्यक नाही.
खालील पर्यायांमधून तुमची निवड करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या परदेशी ट्रिपसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकता
येथे काही देश आहेत ज्यांना अनिवार्य परदेशी ट्रॅव्हल इन्श्युरन्सची आवश्यकता आहे: ही एक सूचक यादी आहे. प्रवासापूर्वी प्रत्येक देशाची व्हिसाची आवश्यकता स्वतंत्रपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो.
स्त्रोत: VisaGuide.World
परदेशात शिक्षण घेण्याची प्लॅनिंग असलेले 16 ते 35 वर्षे दरम्यानचे विद्यार्थी पॉलिसी खरेदी करू शकतात.
होय, पॉलिसी 30 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंत जगभरातील कव्हर प्रदान करते.
कव्हरेज संपूर्ण पॉलिसीच्या कालावधीसाठी आहे.
नाही. तुमची पॉलिसी सुरू होण्याची तारीख आणि खरेदी तारीख ही तुमच्या ट्रिप सुरू होण्याच्या तारखेपेक्षा नंतरची असू शकत नाही.
होय, जर तुम्ही पूर्व-विद्यमान रोग घोषित केला तर तुम्ही स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करू शकता. तथापि, पॉलिसीमध्ये पूर्व-विद्यमान रोगाच्या स्थितीमुळे होणारा वैद्यकीय खर्च वगळला जातो.
प्रायोजकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, उर्वरित कालावधीसाठी ट्युशन कालावधीची पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे कमाल लिमिट पर्यंत परतफेड केली जाईल.
जर दुखापत किंवा आजारपणामुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ हॉस्पिटलायझेशनमुळे किंवा प्रायोजकाच्या अपघाती मृत्यूमुळे तुमच्या अभ्यासात व्यत्यय येत असेल ज्यामुळे तुमच्या उर्वरित सेमिस्टरचा अभ्यास सुटला, तर शैक्षणिक संस्थेला दिलेल्या ॲडव्हान्स ट्यूशन फी मधून वास्तविक रिफंड वजा करून परतफेड केली जाईल.
जर इन्श्युअर्डला सलग 7 दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले असेल आणि कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य त्याच्या/तिच्या कडे लक्ष देण्यासाठी उपस्थित नसेल तर कंपनी कुटुंबातील एका सदस्यासाठी राउंड ट्रिप इकॉनॉमी क्लास एअर तिकीटची व्यवस्था करेल. हे आमच्या पॅनेल डॉक्टरांकडून कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आहे की त्याला/तिला एखाद्या सोबतीची आवश्यकता आहे.
प्रारंभिक पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून तुम्ही 2 वर्षांपर्यंत पॉलिसी अनेक वेळा वाढवू शकता.