ग्रुप मेडिकल इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

    ग्रुप मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी क्लेम प्रोसेस

    क्लेम कसा दाखल करावा
    • पॉलिसी अंतर्गत क्लेम करण्यायोग्य काही घटना घडल्यास, कृपया आमच्या कस्टमर केअर क्रमांक 022-6234 6234 वर कॉल करा
    • आमचे क्लेम सर्व्हिस प्रतिनिधी तुम्हाला आवश्यक क्लेम प्रक्रिया आणि डॉक्युमेंट्स बाबत मार्गदर्शन करतील.
    • क्लेम फॉर्म तुम्हाला मेल, ईमेल किंवा फॅक्सद्वारे फॉरवर्ड केला जाईल.
    • खाली दर्शविल्याप्रमाणे नुकसानाच्या स्वरुपाशी संबंधित क्लेम फॉर्म पूर्ण करा.
    • क्लेमच्या प्रकारासाठी नमूद केलेली डॉक्युमेंट्स जोडा.

    क्लेमसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

    अपघाती दुखापतीच्या क्लेमसाठी
    • क्लेम फॉर्म
    • पोलिस रिपोर्ट, जर अपघात पोलिसांना कळवला गेला असेल
    • मेडिकल पेपर्स, पॅथॉलॉजी रिपोर्ट्स, एक्स-रे रिपोर्ट्स आणि प्लेट्स, लागू असल्याप्रमाणे
    • डॉक्टरांचे वैद्यकीय प्रीस्क्रिप्शन, आयटमाईज्ड बिल आणि कॅश मेमो*
    • हॉस्पिटल डिस्चार्ज कार्ड

    आजार/रोगामुळे हॉस्पिटलायझेशनसाठी
    • क्लेम फॉर्म
    • मेडिकल पेपर्स, पॅथॉलॉजी रिपोर्ट्स, एक्स-रे रिपोर्ट्स, लागू असल्याप्रमाणे
    • डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन आणि सुचविलेली उपचार पद्धती
    • आयटमाईज्ड बिल आणि कॅश मेमो*
    • हॉस्पिटल डिस्चार्ज कार्ड

    *पूर्णपणे आयटमाईज्ड वैद्यकीय बिलांच्या कॉपी. आयटमाईज्ड बिलांमध्ये रुग्णाचे नाव, उपचाराची तारीख, दिलेल्या उपचाराचा प्रकार, उपचार केल्या जाणाऱ्या स्थितीचे निदान किंवा स्वरुप आणि हॉस्पिटल/नर्सिंग होमचे नाव आणि ॲड्रेस दाखवणे आवश्यक आहे.


    • वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट्स दाखल केलेल्या क्लेमच्या स्वरुपानुसार मागितले जाऊ शकतात
    • तुम्ही परिशिष्ट सह क्लेम फॉर्म आमच्या क्लेम प्रोसेसिंग सेलला खालील ॲड्रेसवर पाठवू शकता:
    • क्लेम्स डिपार्टमेंट
      एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड
      6th फ्लोअर, लीला बिझनेस पार्क,
      अंधेरी – कुर्ला रोड, अंधेरी (ईस्ट)
      मुंबई - 400059
    • कृपया तुमच्या रेकॉर्डसाठी पाठवलेल्या डॉक्युमेंट्सची कॉपी राखून ठेवा. (N.B इन्श्युअर्ड किंवा इन्श्युअर्डच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे पॉवर ऑफ ॲटर्नीच्या माध्यमातून भरले गेले पाहिजे. या क्लेम फॉर्मचे जारी करणे इन्श्युररच्या वतीने पॉलिसी अंतर्गत लायबिलिटीची स्वीकृती म्हणून मानले जाऊ नये)


    सर्व क्लेम एचडीएफसी एर्गो GIC लि. द्वारे नियुक्त सर्वेक्षकाच्या मंजुरीच्या अधीन आहेत
अवॉर्ड्स आणि मान्यता
x