
माचले चोपडा गाव जळगाव, महाराष्ट्र स्थित शाळा
The focal area of our CSR activity is our flagship initiative called “Gaon Mera” which is aimed at improving the current status of Education and Sanitation in selected villages.
शिक्षण आणि ग्रामीण विकास
असं म्हटलं जातं की, शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जणू दुसर घरच आहे. अनेक सरकारी शाळांमध्ये मुलभूत सुविधांची वानवा दिसते. पाणी, वीज तसेच स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव जाणवतो. काही सरकारी शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, ग्रंथालय यांसारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध नसतात. तर बहुतांश शाळांमध्ये कॉम्प्युटर लॅब्स नसतात.
मुलभूत सुविधांची दरी कमी करण्याच्या हेतूने व शाश्वत शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एचडीएफसी एर्गोने "गाव मेरा" हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षणाचे शाश्वत विकास ध्येय (SDG) साध्य करण्यासाठी कंपनीने ग्रामीण भारतातील सरकारी शाळांच्या पायाभूत भौतिक सुविधांच्या पुर्ननिर्माणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. नवीन तयार केलेल्या शाळांचे चांगल्याप्रकारे बांधकाम केले गेले आहे आणि लर्निंग एड्स (BaLA मार्गदर्शक तत्त्वे) म्हणून बिल्डिंगचा वापर केला जातो. ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे जिचे शिक्षण संदर्भात मुलांसाठी-अनुकूल आणि मजेदार प्रत्यक्ष वातावरण विकसित करून शिक्षणात गुणात्मक सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रोसेस मध्ये, आम्ही सुनिश्चित करतो की क्लासरुममध्ये पुरेसा प्रकाश आणि व्हेंटिलेशन असावे. नव्याने बांधलेल्या शाळा बेंच, डेस्क, ग्रीन बोर्ड, किचन, डायनिंग सुविधा, लायब्ररी आणि कॉम्प्युटर रुमसह सुसज्ज आहेत.
आमच्या कर्मचार्यांनी कॉस्मिक डिव्हाईन सोसायटीसह मुंबईतील वंचित मुलांना पौष्टिक जेवण देण्यासाठी स्वयंसेवा केली.
चेन्नई, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, बंगळुरू आणि चंदीगड येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांची स्वयंसेवा. ग्रामीण लोकांमध्ये मोतीबिंदू, ग्लुकोमा, मधुमेह रेटिनोपॅथी, रेटिनल विकार आणि अन्य नेत्र विकाराविषयी जागरूकता पसरविणे हा नेत्र शिबिराचा भाग होता.
एचडीएफसी एर्गोच्या कर्मचाऱ्यांनी पुण्यातील गराडे गावात पाणलोट निर्माण करण्यासाठी HT पारेख फाऊंडेशनसह पाणी फाऊंडेशनसह श्रमदानासाठी स्वयंसेवा केली. स्वयंसेवकांनी 03 कम्पार्टमेंट बांध तयार केले ज्यात एकावेळी जवळपास 30,000 लिटर पाणी भरले जाऊ शकते आणि एकूण 1,45,000 लिटर पाण्याची क्षमता असते.
एचडीएफसी एर्गो CSR उपक्रमांबाबत शंका, सूचना आणि अभिप्रायासाठी, आम्हाला येथे लिहा: csr.initiative@hdfcergo.com