Knowledge Centre
Happy Customer
#3.7 कोटी+

आनंदी कस्टमर्स

Cashless network
16000+ˇ

कॅशलेस नेटवर्क

Customer Ratings
प्रीमियम सुरुवात

केवळ ₹ 26/दिवस **

3 Claims settled every minute
97.5% हेल्थ क्लेम

FY 25° मध्ये पेआऊट रेशिओ

होम / हेल्थ इन्श्युरन्स / कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स

कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स

health insurance plans for family

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी एकाच प्लॅन अंतर्गत तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य आणि कल्याण सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाईन केली गेली आहे. हे हॉस्पिटलायझेशन, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, निदान खर्च आणि प्रतिबंधात्मक काळजीसाठी कव्हरेज प्रदान करते. हे सुनिश्चित करते की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला फायनान्सची चिंता न करता दर्जेदार हेल्थकेअरची उपलब्धता होईल.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स म्हणजे काय?

जर तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला आणि उपचार करावे लागले तर त्यासाठीचा खर्च फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जाऊ शकतो.

कस्टमाईज करण्यायोग्य पर्यायांसह, फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी मनःशांती आणि सुरक्षा प्रदान करते. तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स निवडताना, दोन प्रमुख घटकांचा विचार करणे आवश्यक आहे: कव्हर करावयाच्या सदस्यांची संख्या आणि सम इन्श्युअर्ड.

तुम्ही भरत असलेल्या प्रीमियमसाठी सर्वोत्तम कव्हरेज देणारा प्लॅन निवडा. एचडीएफसी एर्गोमध्ये, आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स प्रदान करतो जे हॉस्पिटलायझेशन शुल्क, कन्सल्टेशन शुल्क, औषधे आणि बरेच काही कव्हरेज अशा अनेक लाभांसह येतात. तुमच्या गरजा पूर्ण करणारी पॉलिसी शोधण्यासाठी आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतली जाईल याची खात्री करण्यासाठी तुम्ही आमची पॉलिसी ऑनलाईन पाहू शकता.

अधिक वाचा

एचडीएफसी एर्गोद्वारे कुटुंबासाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स

एचडीएफसी एर्गो तुम्हाला तुमच्या प्रियजनांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे सुरक्षित करण्यास मदत करण्यासाठी खालील फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स ऑफर करते.

slider-right
Optima Secure +

ऑप्टिमा सिक्युअर +

ऑप्टिमा सिक्युअर+ प्लॅन तुमच्या सर्व आरोग्याच्या गरजांसाठी सरळ आणि शक्तिशाली उपाय म्हणून डिझाईन केलेला आहे. हे तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना पूर्ण मनःशांती देण्यासाठी बनवले आहे, कारण तुमच्याकडे एक अशी योजना आहे जी केवळ तुम्हालाच कव्हर करत नाही तर तुमच्यासोबत वाढते देखील.



प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
Medisure Super Top-up

मेडिश्युअर सुपर टॉप-अप

अधिक प्रीमियम न भरता जास्त कव्हरेजची आवश्यकता आहे का? माय:हेल्थ मेडिश्युअर सुपर टॉप-अप प्लॅन तुम्हाला मदत करू शकतो. कारण किमान खर्चात तुमच्या एकूण हेल्थ कव्हर मध्ये वाढ होते. हे तुमच्या विद्यमान पॉलिसीसह काम करते आणि तुमच्या वाढत्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष उपचार लाभांसह आजीवन नूतनीकरण ऑफर करते.



प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
my:Optima Secure

माय:ऑप्टिमा सिक्युअर
(नो कॉस्ट इंस्टॉलमेंट उपलब्ध*^)

एचडीएफसी एर्गोचा हा फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 4X हेल्थ कव्हरेज ऑफर करतो. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या प्राधान्यित सम इन्श्युअर्डच्या खर्चात हेल्थ कव्हरेजमध्ये 4 पट अधिक लाभ मिळतात. तडजोड न करता दर्जेदार वैद्यकीय उपचार प्राप्त करण्यासाठी OPD कव्हरेज आणि रुम भाडे कॅपिंग नसलेले इतर लाभ पाहा.


प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
slider-left

तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स महत्त्वाचा का आहे

अनेक कुटुंबांना असा विश्वास वाटतो की वैद्यकीय खर्च मॅनेज करण्यासाठी त्यांची बचत पुरेशी आहे. तथापि, वाढत्या हेल्थकेअर खर्चामुळे अपेक्षेपेक्षा तुमची बचत वेगाने कमी होऊ शकते. तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करताना तुमच्या आयुष्यातील बचतीचे संरक्षण करण्यासाठी कुटुंबांसाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी हे एक महत्त्वाचे साधन आहे.

कॉम्प्रिहेन्सिव्ह फॅमिली हेल्थ कव्हर तुम्हाला वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या युगातही तुमच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. यामुळे कोणत्याही आर्थिक तणावाशिवाय दर्जेदार आरोग्यसेवेचा वेळेवर ॲक्सेस सुनिश्चित होतो.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन कसा मदत करतो


• वैद्यकीय खर्च कव्हर करते

हॉस्पिटलायझेशन, सर्जरी, डॉक्टर फी, औषधे आणि संबंधित हेल्थकेअर खर्चासाठी देय करते.

• दर्जेदार वैद्यकीय सेवेचा ॲक्सेस

अधिक बिलांची चिंता न करता प्रतिष्ठित हॉस्पिटल्समध्ये उपचारांची उपलब्धता होते.

• प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप

आरोग्य समस्या लवकरात लवकर शोधण्यास मदत करते. ज्यामुळे भविष्यातील वैद्यकीय गुंतागुंतीची जोखीम कमी करू शकते.

• वैद्यकीय महागाईपासून संरक्षण

तुमच्या पैशांचे वेगाने वाढणाऱ्या हेल्थकेअर खर्चापासून संरक्षण करते. सध्याच्या वर्तमान महागाई कलांचा विचार करता पुढील 5 वर्षांमध्ये दुप्पट होऊ शकते.

• कर बचत^

अदा केलेले प्रीमियम सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स कपातीसाठी पात्र आहेत. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वर्षी अधिक बचत करण्यास मदत होते.

• संपूर्ण कुटुंबासाठी मनःशांती

आपत्कालीन परिस्थितीत फंडची व्यवस्था करण्याऐवजी तुम्ही रिकव्हरी आणि केअरवर लक्ष केंद्रित करू शकता याची खात्री करते.

वैद्यकीय महागाई तुमच्यावर कसा परिणाम करू शकते - आणि फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स का आवश्यक आहे

वैद्यकीय महागाईमुळे आरोग्यसेवेच्या खर्चात सातत्याने वाढ झाली आहे. खिशातून वैद्यकीय खर्चाची पूर्तता करणे अधिक कठीण होत आहे.

नियमित सल्ला आणि निदान चाचण्या किंवा शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचार असोत, प्रत्येक वर्षी आरोग्यसेवेचा खर्च वाढत आहे. भारतात अलीकडील वर्षांमध्ये वैद्यकीय महागाई ही सर्वसाधारण महागाईपेक्षा अधिक ठरली आहे.

या परिस्थितीत, तुमच्या कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी असणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स निवडण्याच्या महत्त्वावर भर देणारे काही ट्रेंड येथे दिले आहेत:

भारतामधील वैद्यकीय खर्च वाढीचा दर हा आरोग्यसेवेवरील खर्चातील जलद वाढीचा दर दर्शवतो . 2026 मध्ये सुमारे 11.5% राहण्याचा अंदाज आहे. तर सर्वसाधारण महागाई सुमारे 4%–5% इतकी आहे. म्हणजेच वैद्यकीय उपचारांचा खर्च हा एकूण कंझ्युमर किमतींच्या तुलनेत जवळपास तीनपट वेगाने वाढत आहे. [1]

my: health Suraksha silver health insurance plan

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स कसा उपयुक्त ठरतो:

हेल्थ इन्श्युरन्स परवडणाऱ्या प्रीमियमवर वर्षानंतर वाढत्या हेल्थकेअर खर्चापासून संरक्षण करून आर्थिक कवच म्हणून कार्य करू शकतो.

आज हॉस्पिटलचे बिल विशेषत: खासगी हॉस्पिटल्समध्ये लाखो रुपयांपर्यंत जाऊन पोहोचत आहे. खरंतर 3 ते 5 दिवसांच्या थोड्या काळासाठी हॉस्पिटलमध्ये राहणे देखील तुमच्यासाठी आर्थिक तणाव निर्माण करू शकते.

my: health Suraksha silver health insurance plan

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स कसा उपयुक्त ठरतो:

फॅमिली मेडिकल हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये रुम भाडे, डॉक्टरांचे शुल्क, शस्त्रक्रिया खर्च, ICU शुल्क आणि नर्सिंग केअर यासारख्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर केला जातो. यामुळे तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या दीर्घकालीन सेव्हिंग्स मधून खर्च करण्याची किंवा लोन घेण्याची गरज भासत नाही.

भारतीय त्यांच्या एकूण आरोग्यसेवेच्या खर्चाच्या 60% पेक्षा जास्त खिशातून खर्च करतात, जे प्रादेशिक सरासरीपेक्षा जास्त आहे. [2] हे मुख्यत्वे वाढते उपचार खर्च आणि मर्यादित सरकारी आरोग्यसेवेच्या निधीमुळे आहे.

my: health Suraksha silver health insurance plan

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स कसा उपयुक्त ठरतो:

अनेक फॅमिली हेल्थ कव्हरेज प्लॅन्समध्ये प्री- आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशन खर्च, डे केअर प्रोसेस आणि काही प्रकरणांमध्ये, OPD कन्सल्टेशन्स आणि निदान कव्हर केले जातात. यामुळे वारंवार खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.

हृदय बायपास शस्त्रक्रियेचा खर्च ₹5 लाख ते ₹20 लाखांपर्यंत जाऊ शकतो. तर कर्करोगावरील उपचारांचा खर्च ₹10 लाख ते ₹15 लाखांपर्यंत असू शकतो. या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिन्यात तसेच वर्षभरात ही वाढ दिसून आली आहे.

my: health suraksha silver insurance plan

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स कसा उपयुक्त ठरतो:

तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम मेडिकल इन्श्युरन्स हा अधिक सम इन्श्युअर्ड पर्याय आणि कव्हरचे रिस्टोरेशन यासारखे वैशिष्ट्ये प्रदान करेल. पॉलिसीचा एका वर्षात अनेकवेळा उपयोग करण्यात आला असला तरीही तुम्हाला पर्याप्त फायनान्शियल सहाय्य देऊ शकतात. अधिक संरक्षणासाठी क्रिटिकल इलनेस ॲड-ऑन्स देखील निवडू शकतात.

औषधांचा खर्च, विशेषत: दीर्घकालीन रोग व्यवस्थापन औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डायबेटिस किंवा हायपरटेन्शन सारख्या दुर्धर स्थितींसाठी उपचारांच्या खर्चात वार्षिक 10-12% ने वाढ नोंदविली गेली आहे. या परिस्थितींना आजीवन औषधांची आवश्यकता असल्याने, कुटुंबांना अनेकदा सतत फायनान्शियल भार सहन करावा लागतो. ज्यामध्ये दरवर्षी सातत्याने वाढ होते.

my: women health Suraksha silver health insurance plan recommendation

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स कसा उपयुक्त ठरतो:

फॅमिली इन्श्युरन्स प्लॅन्स हे हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशन केअर दरम्यान द्यावयाच्या औषधांना कव्हर करतात. यामुळे दीर्घकालीन उपचारांचा फायनान्शियल परिणाम कमी होऊ शकतो.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे काय कव्हर केले जाते

Hospitalisation (including COVID-19) Coverage by HDFC ERGO Health Insurance

हॉस्पिटलायझेशन (कोविड-19 सह)

आमचे फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स हे या प्लॅन अंतर्गत कव्हर केलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यासाठी सर्व प्रकारच्या हॉस्पिटलायझेशनला कव्हर करतात. आपत्कालीन परिस्थिती आणि नियोजित प्रोसेस दोन्ही कव्हर केल्या जातात. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी ऑप्टिमा रिस्टोअर प्लॅन निवडला तर तुम्हाला क्लेमनंतर तुमच्या सम इन्श्युअर्डचे 100% रिस्टोरेशन मिळते. त्यामुळे, तुम्हाला संपूर्ण वर्षभर तुमच्या प्रियजनांसाठी वैद्यकीय खर्चाची काळजी करण्याची गरज नाही.

Pre and Post Hospitalisation Coverage by HDFC ERGO Health Insurance

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन

काही आजारांना ॲडमिशन पूर्वीही वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक असू शकते आणि डिस्चार्जनंतर निरंतर काळजी घेणे आवश्यक असू शकते. संपूर्ण सपोर्ट सुनिश्चित करण्यासाठी, आमचे मेडिकल फॅमिली इन्श्युरन्स प्लॅन्स अनुक्रमे 60 आणि 180 दिवसांच्या प्री आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशन केअरसाठी खर्च कव्हर करतात.

All Day Care Treatments Coverage by HDFC ERGO Health Insurance

ऑल डे केअर ट्रीटमेंट्स

वैद्यकीय प्रगतीमुळे महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आणि उपचार 24 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करणे शक्य झाले आहे. आमचे प्लॅन्स सर्व मंजूर डे केअर प्रोसेस कव्हर करतात. त्यामुळे, आम्ही वैद्यकीय खर्चाची काळजी घेत असताना तुम्ही किंवा तुमच्या प्रियजन त्याच दिवशी घरी परत येऊ शकतात.

Preventive Health Check-Up at No Cost Coverage by HDFC ERGO Health Insurance

कोणत्याही खर्चाशिवाय प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप

उपचारापेक्षा प्रतिबंध निश्चितच चांगला आहे. म्हणूनच आमची फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी सर्व कव्हर केलेल्या सदस्यांसाठी रिन्यूवलच्या वेळी मोफत हेल्थ चेक-अप ऑफर करतात. जर कोणत्याही सदस्यासाठी वैद्यकीय स्थिती आढळली तर लवकरात लवकर मदत प्राप्त केली जाऊ शकते. ज्यामुळे बिलाचा भार कमी होतो.

Emergency Air Ambulance Coverage by HDFC ERGO Health Insurance

आपत्कालीन एअर ॲम्ब्युलन्स

गंभीर परिस्थितीत जेव्हा प्रगत वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते तेव्हा तत्काळ वाहतूक जीव वाचवू शकते. ऑप्टिमा सिक्युअर प्लॅन अंतर्गत, आम्ही ₹5 लाख पर्यंत एअर ॲम्ब्युलन्स खर्चाचे रिपेमेंट करतो. जेणेकरून तुमच्याकडे सर्वोत्तम वैद्यकीय सुविधांचा वेळेवर ॲक्सेस उपलब्ध असेल.

Road Ambulance Coverage by HDFC ERGO Health Insurance

रोड ॲम्ब्युलन्स

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, वेळेवर नजीकच्या हेल्थकेअर सेंटरपर्यंत पोहोचण्यासाठी सुसज्ज ॲम्ब्युलन्स महत्त्वाची आहे. फॅमिली कव्हरेजसाठीचा आमचा मेडिकल इन्श्युरन्स सर्वांसाठी सुरक्षा आणि वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी रोड ॲम्ब्युलन्स खर्चाची काळजी घेतो.

Daily Hospital Cash Coverage by HDFC ERGO Health Insurance

दैनंदिन हॉस्पिटल कॅश

जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले जाते तेव्हा प्रवासाचा खर्च, भोजन आणि इतर खिशातून होणारे खर्च यासारखे अनेक खर्च उद्भवू शकतात. हा भार कमी करण्यासाठी, ऑप्टिमा सिक्युअर प्लॅन हॉस्पिटलायझेशन दरम्यान दररोज ₹800 याप्रमाणे कमाल ₹4,800 पर्यंतचे दैनंदिन हॉस्पिटल कॅश अलाउन्स प्रदान करते.

E Opinion for 51 illnesses Coverage by HDFC ERGO Health Insurance

51 गंभीर आजारांसाठी सेकंड ई-ओपिनियन

उपचारांबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सेकंड ओपिनियन अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. ऑप्टिमा सिक्युअर प्लॅन अंतर्गत, तुम्ही भारतातील आमच्या नेटवर्क स्पेशलिस्टद्वारे 51 गंभीर आजारांसाठी ई-ओपिनियन सेवांचा लाभ घेऊ शकता, त्‍यासाठी प्रत्यक्ष भेटीची गरज नाही.

Home Healthcare Coverage by HDFC ERGO Health Insurance

होम हेल्थकेअर

कधीकधी आपण आपल्या घराच्या चार भिंतींच्या आत अधिक चांगल्या प्रकारे बरे होतो किंवा वेगाने बरे होण्यासाठी आपल्याला आपल्या प्रियजनांच्या सोबतीची गरज असते. डॉक्टरांनी सल्ला दिल्यास, आमचे प्लॅन्स कॅशलेस आधारावर होम हॉस्पिटलायझेशनसाठी वैद्यकीय खर्च कव्हर करतात.

Organ Donor Expenses Coverage by HDFC ERGO Health Insurance

अवयव दाता खर्च

अवयव दान जीवनरक्षक ठरू शकते, परंतु त्यामध्ये अनेकदा मोठा वैद्यकीय खर्च येतो. आम्ही दात्याच्या शरीरातून प्रमुख अवयव काढण्यासाठी वैद्यकीय खर्च कव्हर करतो जिथे इन्श्युअर्ड (व्यक्ती किंवा कुटुंब) प्राप्तकर्ता असते.

Alternative Treatments Coverage by HDFC ERGO Health Insurance

पर्यायी उपचार

आम्ही तुमच्या आरोग्यसेवेच्या निवडीचा आदर करतो. आमचे फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथी सारख्या पर्यायी उपचारांसाठी सम इन्श्युअर्ड पर्यंत इन-पेशंट उपचारांचा खर्च कव्हर करतात, मात्र ते उपचार मान्यताप्राप्त केंद्रावर घेतले गेले असावेत.

Lifelong Renewability Coverage by HDFC ERGO Health Insurance

आजीवन रिन्यूवल

आमचा ऑप्टिमा सिक्युअर प्लॅन तुमच्या पाठीशी आहे. ब्रेक-फ्री रिन्यूवल केल्‍यास ते आयुष्यभरासाठी तुमचा वैद्यकीय खर्च कव्हर करू शकते. यामुळे, कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या काळात तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय चिंता किंवा आर्थिक विवंचनेशिवाय योग्य काळजी आणि आधार मिळवू शकता याची खात्री बाळगू शकता.

कृपया माझ्या ऑप्टिमा सिक्युअरविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी, ब्रोशर आणि प्रॉस्पेक्टस वाचा.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे काय कव्हर केले जात नाही

Adventure Sport Injuries Coverage by HDFC ERGO Health Insurance

ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती

ॲडव्हेंचर तुम्हाला थरार देऊ शकतात, परंतु त्यामध्ये दुखापत होण्याचा धोकाही जास्त असतो. आमचे कुटुंबासाठीचे मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्स ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना झालेल्या अपघातांना कव्हर करत नाहीत.

Breach of Law Coverage by HDFC ERGO Health Insurance

कायद्याचे उल्लंघन

आम्ही इन्श्युअर्ड व्यक्तीने गुन्हेगारी कृत्य करण्याचा किंवा कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे थेट उद्भवलेल्या उपचारांचा खर्च कव्हर करत नाही.

War Coverage by HDFC ERGO Health Insurance

युद्ध

युद्ध, आक्रमण, गृहयुद्ध, बंडखोरी, विद्रोह किंवा युद्धासारख्या इतर कोणत्याही कारवायांमुळे उद्भवणारे क्लेम्स या पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जात नाहीत.

Excluded Providers Coverage by HDFC ERGO Health Insurance

वगळलेले प्रोव्हायडर्स

आम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही मेडिकल प्रॅक्टिश्नर किंवा इन्श्युररद्वारे विशेषत: वगळलेल्या कोणत्याही इतर प्रदात्याद्वारे उपचारांसाठी झालेला खर्च कव्हर करत नाही.. तुम्ही डी-एम्पॅनेल्ड किंवा वगळलेल्या हॉस्पिटल्सची नवीनतम यादी मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधू शकता.

Congenital external diseases, defects or anomalies, Coverage by HDFC ERGO Health Insurance

जन्मजात बाह्य रोग, दोष किंवा असंगती

जे आजार किंवा शारीरिक दोष जन्मापासून आहेत आणि जे शरीराच्या बाहेरून स्पष्टपणे दिसतात, त्यांना या इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केले जात नाही.

Treatment for Alcoholism & Drug Abuse Coverage by HDFC ERGO Health Insurance

मद्यपान आणि ड्रग्स गैरवापरासाठी उपचार

मद्यपान, ड्रग्स किंवा इतर अंमली पदार्थांचे सेवन, किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेसाठी केलेले उपचार आणि त्यापासून उद्भवणारे परिणाम या पॉलिसीमध्ये कव्हर केले जात नाहीत.

Buy HDFC ERGO Health Insurance Plan
तुम्हाला माहित आहे?
जेव्हा 4 पैकी 1 भारतीयाला संसर्गजन्य नसलेले आजार होण्याचा धोका आहे, तेव्हा तुमच्या कुटुंबाची वैद्यकीय सुरक्षा नेहमीपेक्षा जास्त महत्त्वाची ठरते.

तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्याचे लाभ काय आहेत?

जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी मेडिकल हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करता, तेव्हा तुम्हाला अनेक लाभांचा ॲक्सेस मिळतो. भारतातील सर्वोत्तम फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचे प्रमुख लाभ येथे दिले आहेत:

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती न सांगता कधीही येऊ शकते आणि अनेकदा त्‍यासोबत मोठा खर्चही येतो. पुरेशा इन्श्युरन्सशिवाय, कुटुंबांना आपली बचत खर्च करण्यास किंवा कर्ज घेण्यास भाग पाडले जाऊ शकते.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन हॉस्पिटलायझेशन, सर्जरी, आपत्कालीन उपचार आणि गंभीर आजारांवरील उपचारांना कव्हर करण्यास मदत करते.

my: health Suraksha silver health insurance plan

एचडीएफसी एर्गो ॲडव्हान्टेज:

कुटुंबासाठी एचडीएफसी एर्गोचा मेडिकल इन्श्युरन्स हॉस्पिटल्सच्या विस्तृत नेटवर्कमध्ये कॅशलेस उपचार ऑफर करतो. हे कुटुंबांना आर्थिक तणावाशिवाय आपत्कालीन वैद्यकीय खर्च मॅनेज करण्यास मदत करते.

एक उत्तम फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुमच्या पती/पत्नी, मुले आणि कधीकधी पालकांसाठी एकाच पॉलिसीअंतर्गत कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज ऑफर करतो. यामध्ये सहसा खालील बाबींचा समावेश होतो:

• इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन

• डे केअर प्रक्रिया

• हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च

• आयुष उपचार आणि प्रीव्हेंटिव्ह केअर

my: health Suraksha silver health insurance plan

एचडीएफसी एर्गो ॲडव्हान्टेज:

ऑप्टिमा सिक्युअर - फॅमिली प्लॅन कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 4X कव्हरेज प्रदान करून हे कव्हरेज अधिक व्यापक करतो. त्यामुळे, तुमच्या प्रियजनांना संपूर्ण वर्षभर सर्वोच्‍च संरक्षण मिळते.

भारतातील आरोग्यसेवेचा खर्च सामान्य महागाईपेक्षा वेगाने वाढत आहे, विशेषत: मेट्रो शहरांमध्ये. प्रगत उपचार, निदान चाचण्या आणि हॉस्पिटलमध्ये राहणे महाग असू शकते.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन वैद्यकीय महागाईविरुद्ध आर्थिक कवच म्हणून कार्य करते आणि तुम्हाला आर्थिक चिंता न करता दर्जेदार आरोग्य सेवा मिळवण्यास मदत करते.

my: health Suraksha silver health insurance plan

एचडीएफसी एर्गो ॲडव्हान्टेज:

एचडीएफसी एर्गो प्लॅन्ससह उपलब्ध सम इन्श्युअर्ड रिस्टोरेशन आणि मल्टीप्लायर लाभ यासारखी वैशिष्ट्ये आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चातही तुमचे कव्हरेज पुरेसे ठेवण्यास मदत करतात.

अनेक नियोक्ते ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स ऑफर करत असले तरी, हे कव्हरेज तात्पुरते आणि अटींच्या अधीन असते. जोपर्यंत तुम्ही त्या संस्थेत कार्यरत आहात, तोपर्यंतच हे कव्हरेज वैध राहते. नोकरी बदलताना, दीर्घकालीन रजेच्या काळात किंवा प्रोबेशन कालावधीत, तुमच्‍या कुटुंबाकडे कोणतेही हेल्थ कव्हर नसण्याची शक्यता असते.

my: health suraksha silver insurance plan

एचडीएफसी एर्गो ॲडव्हान्टेज:

आजीवन नूतनीकरण आणि वैयक्तिक मालकीसह, एचडीएफसी एर्गो फॅमिली हेल्थ प्लॅन्स नोकरीतील बदल किंवा करिअर ब्रेक दरम्यानही अखंडित कव्हरेज सुनिश्चित करतात.

प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा एकच फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करणे अनेकदा अधिक परवडणारे आणि फायदेशीर असते.

my: women health Suraksha silver health insurance plan recommendation

एचडीएफसी एर्गो ॲडव्हान्टेज:

एचडीएफसी एर्गो फॅमिली फ्लोटर प्लॅन्ससह उपलब्ध रिस्टोरेशन लाभासह, कुटुंबे भरमसाठ प्रीमियमची चिंता न करता अखंड कव्हरेजचा आनंद घेऊ शकतात.

बहुतांश फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये नियमित अंतराने मोफत प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप्‍सचा समावेश होतो. जर आरोग्याच्या समस्यांचे वेळीच निदान झाले, तर कमी खर्चात दीर्घकालीन उपचार लवकर घेता येतात आणि उपचारांचे परिणाम देखील सुधारतात.

my: women health Suraksha silver health insurance plan recommendation

एचडीएफसी एर्गो ॲडव्हान्टेज:

एचडीएफसी एर्गो अनेक प्लॅन्स अंतर्गत रिन्यूवलवर मोफत प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप ऑफर करते. यामुळे आजाराचे वेळीच निदान होण्यास प्रोत्साहन मिळते आणि दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापनासाठी मदत होते.

तुमच्या प्रियजनांना वैद्यकीय आणीबाणीच्या काळात आर्थिक संरक्षण आहे हे जाणून घेतल्यामुळे तुम्ही खर्चाऐवजी आजारातून बरे होण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. फॅमिली मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी दीर्घकालीन सुरक्षा, स्थिरता आणि मन:शांती प्रदान करते.

my: women health Suraksha silver health insurance plan recommendation

एचडीएफसी एर्गो ॲडव्हान्टेज:

रुम भाड्यात कोणतेही कॅपिंग नसणे, OPD कव्हर, आपत्कालीन ॲम्ब्युलन्स सेवा आणि रिस्टोर बेनिफिट्स यांसारखे लाभ कॉम्प्रिहेन्सिव्ह संरक्षण आणि मनःशांती सुनिश्चित करतात.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी भरलेले प्रीमियम प्राप्तिकर कायद्याच्या सेक्शन 80D अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत. तुम्ही स्वत:साठी, पती/पत्नी आणि मुलांसाठी ₹25,000 पर्यंत बचत करू शकता आणि जर तुम्ही सीनिअर सिटीझन पालकांचा देखील विमा उतरवला असेल तर अतिरिक्त ₹50,000 ची बचत करू शकता.

my: women health Suraksha silver health insurance plan recommendation

एचडीएफसी एर्गो ॲडव्हान्टेज:

सर्व एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स सेक्शन 80D च्‍या कर लाभांसाठी पात्र आहेत.

तुम्ही तुमच्या फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये तुमच्या पालकांचा समावेश करावा का?

तुमच्या प्रियजनांसाठी हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज प्लॅन करताना, तुम्हाला पडणारा एक सामान्य प्रश्न हा असू शकतो की:

मी माझ्या पालकांना फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत समाविष्ट करावे की त्यांच्यासाठी स्वतंत्र पेरेंट्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी?

दोघांमधील फरक समजून घेणे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते.

वैशिष्ट्य फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॅरेंट्स हेल्थ इन्श्युरन्स
यात कोणाला कव्हर केले जातेएकाच पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारक, पती/पत्नी आणि अवलंबून असलेल्या मुलांना कव्हर करते. कमी वैद्यकीय जोखीम असलेल्या तरुण कुटुंबांसाठी आदर्श.विशेषतः पालकांसाठी, सहसा ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन केलेले, ज्यांना अधिक आणि वारंवार आरोग्यसेवेची गरज असते.
कव्हरेजचा केंद्रबिंदूहॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया, डेकेअर उपचार, मातृत्व लाभ आणि प्रतिबंधात्मक काळजीसाठी विस्तृत कव्हरेज प्रदान करते.वयोमानानुसार येणारे आजार, वारंवार हॉस्पिटलायझेशन, पूर्व-विद्यमान आजार आणि वाढीव वैद्यकीय खर्चावर लक्ष केंद्रित करते.
प्रीमियम खर्चसाधारणपणे अधिक परवडणारे असते, कारण यामध्ये कमी क्लेम शक्यता असलेले तरुण आणि निरोगी सदस्य कव्हर केले जातात.आरोग्यविषयक जोखीम आणि सीनिअर सिटीझन्‍समध्ये क्लेमची अधिक शक्यता असल्याने प्रीमियम जास्त असू शकतो.
पूर्व-विद्यमान आजारपूर्व-विद्यमान आजार कमी असतात आणि कव्हरेजसाठी सहसा प्रतीक्षा कालावधी कमी असतो.पूर्व-विद्यमान आजार असणे सामान्य आहे आणि त्यासाठी दीर्घ प्रतीक्षा कालावधी असू शकतो, जरी अनेक प्लॅन्स एका ठराविक कालावधीनंतर त्यांना कव्हर करता.
क्रिटिकल इलनेस आणि विशेष काळजीक्रिटिकल इलनेस कव्हर ॲड-ऑन म्हणून उपलब्ध असू शकते, परंतु हे प्लॅनचे मुख्य लक्ष नाही.अनेकदा हृदय रोग, कर्करोग आणि किडनी विकार यासारख्या गंभीर आजारांसाठी इन-बिल्ट किंवा वर्धित कव्हरेजचा समावेश होतो.
कर लाभ (सेक्शन 80D) ^प्रीमियम प्रति वर्ष ₹25,000 पर्यंत कर कपातीसाठी पात्र आहेत (60 वर्षांखालील व्यक्तींसाठी).सीनिअर सिटीझन पालकांसाठी (60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या) भरलेल्या प्रीमियमसाठी ₹50,000 पर्यंत अतिरिक्त कर कपात उपलब्ध आहे.

तर, योग्य निवड काय आहे?

काही इन्श्युरन्स कंपन्या पालकांना फॅमिली फ्लोटर प्लॅनमध्ये समाविष्ट करण्याची परवानगी देतात, तरीही त्यांच्यासाठी स्वतंत्र पेरेंट्स हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे अधिक व्यावहारिक आणि किफायतशीर ठरते. यामुळे खालील गोष्टी सुनिश्चित होतात:

• सीनिअर सिटीझन्स साठी पुरेशी सम इन्श्युअर्ड

• वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांसाठी चांगले कव्हरेज

• फॅमिली फ्लोटर सम इन्श्युअर्ड संपण्याची कमी जोखीम

स्वतंत्र पेरेंट्स प्लॅन तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स फॅमिली प्लॅन्ससाठी प्रीमियम आटोक्यात ठेवतांना सेक्शन 80D अंतर्गत कर लाभ वाढवण्यास मदत करतो.

फॅमिली मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्स अंतर्गत किती सदस्य कव्हर केले जाऊ शकतात?

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केलेल्या सदस्यांची संख्या सम इन्श्युअर्ड आणि प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांच्या संख्येवर अवलंबून असते.

सामान्य फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये खालील सदस्यांना कव्हरेज मिळू शकते:

  • दायित्व
  • पती/पत्नी
  • अवलंबून असलेली मुले
  • पालक

काही फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स एक पाऊल पुढे जातात. ते खालील सदस्यांना देखील कव्हरेजची परवानगी देतात:

  • कुटुंबातील अतिरिक्त सदस्य जसे की सासू-सासरे, भावंडे, आजी-आजोबा, नातवंडे, जावई, सून, मेहुणा/दीर, नणंद/साळी, पुतण्या/भाचा आणि पुतणी/भाची.
  • वॉर्ड गार्डियन्स

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अधिक सदस्य जोडल्याने एकूण रिस्क कव्हर वाढते, ज्यामुळे जास्त प्रीमियम होऊ शकतो.

त्यामुळे, जर तुम्ही मोठ्या कुटुंबाचा समावेश करण्याचे नियोजित करत असाल, तर तुम्ही पुरेसा उच्च सम इन्श्युअर्ड निवडावा. हे सुनिश्चित करते की आपत्कालीन परिस्थितीत सर्व सदस्यांच्या वैद्यकीय गरजा कव्हर केल्या जातील.

पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, नेहमी इन्श्युरन्स कंपनीची कुटुंबाची व्याख्या तपासा. तसेच, तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यसेवेच्या आवश्यकतांनुसार कव्हरेज मर्यादा असल्याची खात्री करा.

 

Buy HDFC ERGO Health Insurance Plan for Family
Protect your family with no-cost instalment plans*^

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे कर लाभ काय आहेत? ^

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स केवळ तुमच्या प्रियजनांना केवळ वाढत्या वैद्यकीय खर्चापासून संरक्षित करत नाही तर तुम्हाला प्राप्तिकर कायदा, 1961 च्या सेक्शन 80D अंतर्गत तुमचा कर भार कमी करण्यास देखील मदत करते.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमवर कर लाभ

तुम्ही स्वत:साठी, तुमच्या पती/पत्नी आणि अवलंबून असलेल्या मुलांसाठी भरलेल्या हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमसाठी प्रति आर्थिक वर्ष ₹25,000 पर्यंत कर कपात क्लेम करू शकता. जर पॉलिसीधारक किंवा पती/पत्नी सीनिअर सिटीझन (60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त) असेल तर ही कपात लिमिट ₹50,000 पर्यंत वाढते.

पालकांच्या हेल्थ इन्श्युरन्ससाठी अतिरिक्त कर लाभ

तुमच्या पालकांच्या हेल्थ इन्श्युरन्ससाठी भरलेले प्रीमियम ₹25,000 पर्यंतच्‍या अतिरिक्त कपातीसाठी पात्र आहेत. जर एक किंवा दोन्ही पालक सीनिअर सिटीझन्स असतील तर तुम्ही ₹50,000 पर्यंत जास्त कपात क्लेम करू शकता.

तुम्ही क्लेम करू शकणारी कमाल कपात

तुम्ही एका आर्थिक वर्षात ₹1,00,000 पर्यंत एकूण कपात क्लेम करू शकता जर:

• तुम्ही स्वतः सीनिअर सिटीझन असाल आणि

• तुमचे पालकही सीनिअर सिटीझन्स असतील

यामुळे फॅमिली हेल्थ प्लॅन एक कार्यक्षम कर-बचत साधन ठरते.

प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी कपात

तुम्ही प्रतिवर्ष ₹5,000 पर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीवर झालेला खर्च देखील क्लेम करू शकता. हा लाभ एकूण सेक्शन 80D मर्यादेमध्ये समाविष्ट आहे आणि कपात रक्कम स्वतंत्रपणे वाढवत नाही.

महत्त्वाची नोंद:
सेक्शन 80D लाभ केवळ जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडणाऱ्या करदात्यांसाठी लागू आहेत. याव्यतिरिक्त, कर लाभ प्रचलित कर कायद्यांच्या अधीन आहेत आणि वेळोवेळी बदलू शकतात. वैयक्तिकृत मार्गदर्शनासाठी कर सल्लागाराचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्याच्या गोष्टी

संपूर्ण कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करताना तुम्ही खालील काही घटकांचा विचार केला पाहिजे:

1

कव्हरेजची व्याप्ती

हॉस्पिटलायझेशन, प्री-आणि पोस्ट-हॉस्पिटलायझेशन खर्च, डे केअर प्रोसेस, घरगुती उपचार, ॲम्ब्युलन्स शुल्क आणि अवयव दात्याचा खर्च यासारख्या मुख्य वैद्यकीय गरजा कव्हर करणारा प्लॅन निवडा. कव्हरेज जितके विस्तृत असेल तितके आणीबाणीच्या काळात खिशाला बसणारे अनपेक्षित चटके कमी असतात.

2

पुरेशी आणि लवचिक सम इन्श्युअर्ड

वैद्यकीय खर्च दरवर्षी वाढत आहेत, विशेषतः मेट्रो शहरांमध्ये. असा प्लॅन निवडा जो उच्च सम इन्शुअर्डची मुभा देतो आणि पॉलिसी कालावधीत कव्हरेज वाढवण्यासाठी रिस्टोर किंवा मल्टिप्लायर बेनिफिट्स प्रदान करतो.

3

कॅशलेस हॉस्पिटल नेटवर्क

मजबूत कॅशलेस हॉस्पिटल नेटवर्क तुम्हाला आगाऊ निधीची व्यवस्था न करता उपचार घेण्यास मदत करते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत विलंब टाळण्यासाठी तुमच्या घराजवळील प्रतिष्ठित हॉस्पिटल्स इन्श्युररच्या नेटवर्कचा भाग आहेत का ते नेहमीच तपासा.

4

प्रतीक्षा कालावधी आणि पूर्व-विद्यमान आजार

पूर्व-विद्यमान आजार आणि इतर विशिष्ट उपचारांसाठी असलेला प्रतीक्षा कालावधी समजून घ्या. कमी प्रतीक्षा कालावधी असलेले प्लॅन्स जेव्हा तुमच्या कुटुंबाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा लाभांचा जलद ॲक्सेस ऑफर करतात.

5

क्लेम सेटलमेंट अनुभव

तणावपूर्ण परिस्थितीत सोपी आणि पारदर्शक क्लेम प्रोसेस महत्त्वाची असते. त्रासमुक्त क्लेम, डिजिटल क्लेम ट्रॅकिंग आणि मजबूत कस्टमर सपोर्टसाठी ओळखले जाणारे इन्श्युरर निवडा.

6

धोरण वगळता

ऐनवेळी क्लेम नाकारणे टाळण्यासाठी अपवाद काळजीपूर्वक तपासा. कुटुंबासाठी सर्वोत्तम हेल्थ पॉलिसीमध्ये किमान अपवाद आणि स्पष्टपणे परिभाषित कव्हरेज अटी असाव्यात.

7

वॅल्यू-ॲडेड लाभ

मोफत प्रतिबंधात्मक हेल्थ चेक-अप, होम हेल्थकेअर, सेकंड मेडिकल ओपिनियन्स, इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स कव्हर आणि अशा इतर अतिरिक्त वैशिष्ट्यांमुळे पॉलिसीचे एकूण मूल्य वाढू शकते. तुमच्या गरजेनुसार कोणते लाभ मिळतील हे तपासण्यासाठी फॅमिली कव्हरेजच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना करा.

 

मी फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यास पात्र आहे का?

बहुतांश व्यक्ती आणि कुटुंब फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यास पात्र आहेत. तथापि, पात्रता काही महत्त्वाच्या आधारावर भिन्न असू शकते. चला त्यांना पाहूया:

1. वैद्यकीय इतिहास आणि पूर्व-विद्यमान आजार

हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करताना तुमचा वैद्यकीय इतिहास प्रामाणिकपणे सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.. ताप किंवा फ्लू सारखे किरकोळ आजार महत्त्वाचे नसतील, परंतु कर्करोग किंवा हृदयाच्या आजारांसारखे आजार घोषित करणे आवश्यक आहे. इन्श्युरर प्रतीक्षा कालावधीनंतर काही पूर्व-विद्यमान आजारांना कव्हर करू शकतो, तर काही आजारांसाठी अतिरिक्त प्रीमियमची आवश्यकता असू शकते.

2. वय

18 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करू शकतात. सीनिअर सिटीझन्स सामान्यपणे 65 वयापर्यंत इन्श्युअर्ड होऊ शकतात. एचडीएफसी एर्गोसह, तुमच्या फॅमिली हेल्थ प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या नवजात बाळाला समाविष्ट करून त्‍याचा देखील इन्श्युरन्स मिळवू शकता.

अंतिम पात्रता वैद्यकीय अंडररायटिंगच्या अधीन आहे.

Buy HDFC ERGO Health Insurance Plan for Family with Covid Cover
फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन निवडण्यास तयार आहात का? सुरूवात करण्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात.

इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्श्युरन्स आणि फॅमिली हेल्थ इन्श्युरन्समध्ये काय फरक आहे?

जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्यासाठी काय चांगले आहे – सर्वांसाठी वेगवेगळे इंडिव्हिज्युअल हेल्थ प्लॅन्स की संपूर्ण कुटुंबासाठी एकच हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन , तर त्यातील फरक स्पष्टपणे जाणून घेणे उपयुक्त ठरेल.

वैशिष्ट्य इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्श्युरन्स फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स
व्याख्याफक्त एकाच व्यक्तीला कव्हर करते आणि इन्श्युरन्सची रक्कम त्यांच्या उपचारांसाठी ठेवली जाते, कोणत्याही क्षमतेशिवाय.प्लॅन कुटुंबातील सदस्यांमध्ये सामायिक केला जातो आणि त्यांची कॅप्ड रक्कम असते, जी क्रॉस केल्यानंतर, अन्य कोणत्याही सदस्याद्वारे वापरता येणार नाही.
कव्हरेज या प्रकरणात कव्हर केलेली रक्कम पूर्णपणे वैयक्तिक पॉलिसीधारकासाठी आहे.ही रक्कम संपूर्ण कुटुंबाद्वारे वापरली जाऊ शकते, प्रत्येक सदस्यासाठी कोणतीही निश्चित रक्कम नसते. परंतु ते केवळ सम इन्श्युअर्ड पर्यंतच वापरू शकतात
प्रीमियम पॉलिसीधारकाच्या वयानुसार प्रीमियमची गणना केली जाते.सामान्यपणे, प्रीमियमची गणना करण्यासाठी कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्याचे वय विचारात घेतले जाते.
किंमत प्रभावीपणाकुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी अनेक इंडिव्हिज्युअल पॉलिसी खरेदी केल्यास हे अधिक महाग असू शकते.प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्यापेक्षा अधिक किफायतशीर, विशेषतः तरुण कुटुंबांसाठी
लवचिकताएका व्यक्तीच्या आरोग्याच्या गरजांवर आधारित कव्हरेज, ॲड-ऑन्स आणि सम इन्श्युअर्ड कस्टमाईज करणे सोपे. कस्टमायझेशन संपूर्ण कुटुंबासाठी लागू होते, ज्यामुळे विशिष्ट आरोग्य आवश्यकता असलेल्या सदस्यांसाठी लवचिकता मर्यादित होऊ शकते.
क्लेमचा प्रभाव केलेले क्लेम केवळ वैयक्तिक पॉलिसीधारकाच्या लाभ आणि भविष्यातील प्रीमियमवर परिणाम करतात. एका सदस्याने केलेल्या क्लेममुळे पॉलिसी वर्षात इतर सर्व सदस्यांसाठी उपलब्ध सम इन्शुअर्ड कमी होतो.
योग्यता सीनिअर सिटीझन्स, दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींसाठी किंवा जास्त वैयक्तिक कव्हरेजची आवश्यकता असलेल्यांसाठी योग्य.तरुण सदस्य आणि कमी एकूण आरोग्य जोखीम असलेल्या लहान कुटुंबांसाठी आदर्श.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत?

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स खरेदी करताना आवश्यक असलेल्‍या डॉक्युमेंट्सची यादी येथे दिली आहे:

बहुतांश इन्श्युरन्स कंपन्या प्रवेशाचे वय सेट करत असल्याने, हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करताना वयाचा पुरावा हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. तुम्ही खालीलपैकी कोणत्याही कागदपत्राची कॉपी देऊ शकता:

  • PAN कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • जन्म प्रमाणपत्र

संवादाच्या उद्देशाने, हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडरला पॉलिसीधारकाचा पत्रव्यवहाराचा पत्ता जाणून घेणे आवश्यक आहे. पॉलिसीधारक खालील डॉक्युमेंट्स सादर करू शकतात:

  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • रेशन कार्ड
  • PAN कार्ड
  • आधार कार्ड
  • टेलिफोन बिल, वीज बिल इ. सारखे उपयुक्तता बिल.
  • लागू असल्यास भाडे करार

ओळखीचे पुरावे इन्श्युरन्स कंपनीला पॉलिसीधारक कोण आहे हे व्हेरिफाय करण्यास आणि इन्श्युरन्स पॉलिसी व त्याच्या लाभांसाठी त्यांची पात्रता कन्फर्म करण्यास मदत करतात. पॉलिसीधारक खालील कागदपत्रे सादर करू शकतात:

  • पासपोर्ट
  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • आधार कार्ड
  • वैद्यकीय रिपोर्ट्स (इन्श्युरन्स कंपनीने विचारले असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला प्रपोजल फॉर्म

16,000+
कॅशलेस नेटवर्क
संपूर्ण भारतात

तुमचे नजीकचे कॅशलेस नेटवर्क शोधा

search-icon
किंवातुमच्या नजीकचे हॉस्पिटल शोधा
Find 15,000+ network hospitals across India HDFC Ergo Cashless Network Across India
जसलोक मेडिकल सेंटर

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

रूपाली मेडिकल
सेंटर प्रायव्हेट लिमिटेड

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

जसलोक मेडिकल सेंटर

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

कुटुंब आरोग्य विमा ऑनलाईन का खरेदी करावा?

जेव्हा तुम्ही फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करता, तेव्हा तुम्ही अनेक लाभांचा आनंद घेऊ शकता:

Convenience of Applying HDFC ERGO Health Insurance Online

सुविधा

लांबलचक डॉक्युमेंट्स भरण्याचा आणि रांगेत उभे राहण्याचा त्रास का सहन करावा ऑनलाईन हेल्थ प्लॅन्स अभूतपूर्व सुविधा प्रदान करतात.. तुम्ही संशोधन करू शकता, एक्स्पर्टचे मत जाणून घेऊ शकता आणि केवळ काही क्लिकसह तुमच्या गरजा पूर्ण करणारा फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करू शकता.

Secured Payment Modes for HDFC ERGO Online Health Insurance

सुरक्षित पेमेंट पद्धती

कॉन्टॅक्टलेस पेमेंट हा आता एक नियम बनला असल्याने, रोख किंवा चेकद्वारे पेमेंट करण्याची गरज नाही. ऑनलाईन सुरक्षित पेमेंट करण्यासाठी तुमचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI प्लॅटफॉर्म किंवा नेट बँकिंग सुविधेचा वापर करा.

Have the policy document handy for HDFC ERGO Online Health Insurance

त्वरित कोटेशन

तुम्ही त्वरित प्रीमियम कोट मिळवण्यासाठी प्लॅन कस्टमाईज करू शकता, सदस्यांची संख्या बदलू शकता किंवा प्लॅन सुधारित करू शकता. मॅन्युअली गणना करण्याचे दिवस आता गेले आहेत. जेव्हा तुम्ही फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करता तेव्हा सर्वकाही तुमच्या फिंगरटिप्‍सवर असते.

Absolute transparency for HDFC ERGO Online Health Insurance

जलद पॉलिसी जारी

पॉलिसी डॉक्युमेंटसाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही. तुम्ही पहिले प्रीमियम भरल्याबरोबर तुमच्या मेलबॉक्समध्ये पॉलिसी कागदपत्र त्वरित मिळवा.

Absolute transparency

वॅल्यू-ॲडेड डिजिटल लाभ

माय:हेल्थ सर्व्हिसेस मोबाईल ॲप्लिकेशनमधील सर्व पॉलिसी संबंधित कागदपत्रांचा ॲक्सेस मिळवा.. इतकेच नाही, तर तुम्ही आमच्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन कन्सल्टेशन्स बुक करू शकता, कॅलरीच्या प्रमाणावर लक्ष ठेवू शकता आणि तुमचा BMI देखील मोजू शकता.

Buy HDFC ERGO Health Insurance Plan for Family with Covid Cover
एक छोटीशी शस्त्रक्रिया तुमची वर्षांची बचत संपवू शकते

एचडीएफसी एर्गो कडून फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाईन कसा खरेदी करायचा?

एचडीएफसी एर्गो तुम्हाला फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची विस्तृत श्रेणी ऑफर करते.. तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्लॅन्स खरेदी करू शकता.. फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स ऑनलाईन खरेदी करण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सचे अनुसरण करू शकता:

1. एचडीएफसी एर्गो वेबसाईटला भेट द्या आणि 'खरेदी करा' टॅब अंतर्गत 'हेल्थ इन्श्युरन्स' पर्यायावर क्लिक करा.

2. फॉर्मवर विचारलेले वैयक्तिक तपशील टाईप करा.

3. उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी निवडा आणि सूचनांनुसार पुढील प्रक्रिया करा.

  तुमच्या एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्ससाठी क्लेम कसा करावा?  

कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत फायनान्शियल सपोर्ट मिळवणे. म्हणून, कॅशलेस क्लेम तसेच रिएम्बर्समेंट क्लेमसाठी हेल्थ इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस कशी काम करते हे तुम्हाला माहित असायला हवे.

हेल्थ इन्श्युरन्स कॅशलेस क्लेम 36*~ मिनिटांमध्ये मंजूर होतात

HDFC ERGO Claim settlement : Fill pre-auth form for cashless approval
1

सूचना

कॅशलेस मंजुरीसाठी नेटवर्क हॉस्पिटलमध्ये पूर्व-अधिकृतता फॉर्म भरा.

HDFC ERGO Claim settlement : Health Claim Approval Status
2

मंजुरी/नाकारणे

हॉस्पिटलने आम्हाला कळविल्यानंतर, आम्ही तुम्हाला स्टेटस अपडेट पाठवू.

HDFC ERGO Claim settlement : Hospitalization after approval
3

हॉस्पिटलायझेशन

हॉस्पिटलायझेशन पूर्व-अधिकृत मंजुरीच्या आधारावर केले जाऊ शकते.

HDFC ERGO Medical Claims Settlement with the Hospital
4

क्लेम सेटलमेंट

डिस्चार्जच्या वेळी, आम्ही क्लेम थेट हॉस्पिटलशी सेटल करू.

आम्ही 2.9 दिवसांत ~* रिएम्बर्समेंट क्लेम सेटल करतो

Hospitalization
1

हॉस्पिटलायझेशन

तुम्हाला सुरुवातीला बिल भरावे लागेल आणि मूळ इनव्हॉईस जतन करावे लागेल.

claim registration
2

क्लेम रजिस्टर करा

हॉस्पिटल डिस्चार्ज नंतर, आम्हाला इनव्हाईस आणि उपचाराचे डॉक्युमेंट्स पाठवा.

claim verifcation
3

व्हेरिफिकेशन

आम्ही तुमचे क्लेम संबंधित इनव्हॉईस आणि उपचार डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करू.

claim approval
4

क्लेम सेटलमेंट

आम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये मंजूर क्लेमची रक्कम पाठवतो.

Check Health Insurance Premium for HDFC ERGO Family Health Insurance Plans
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली ना? आत्ताच हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करा!

हेल्थ इन्श्युरन्स बाबतीत रिव्ह्यू आणि रेटिंग

4.4/5 स्टार
rating

आमच्या कस्टमर्सनी आम्हाला रेटिंग दिले आहे

Scroll Right
quote-icons
male-face
DEVENDRA KUMAR

ईझी हेल्थ

5 जून 2023

बंगळुरू

खूपच सर्वोत्तम सर्व्हिस, असेच सुरू असू द्या. टीम मेंबर्सना शुभेच्छा.

quote-icons
male-face
जी गोविंदराजुलू

एचडीएफसी एर्गो ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स

2 जून 2023

कोईम्बतूर

तुमच्या कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह एमएस मेरीला मला धन्यवाद द्यायचे आहेत. ज्यांनी मला तुमच्या वेबसाईटवर क्लेम अपलोड करण्यास मदत केली आहे. त्यांचे माहितीपूर्ण मार्गदर्शन खूपच उपयुक्त होते. अशी मदत आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपच प्रशंसनीय आहे. पुन्हा एकदा धन्यवाद

quote-icons
male-face
ऋषि पराशर

ऑप्टिमा रिस्टोअर

13 सप्टेंबर 2022

दिल्ली

उत्कृष्ट सर्व्हिस, तक्रार करण्यासारखे काहीही नाही. तुम्ही सर्व्हिसच्या बाबतीत नंबर वन आहात. माझ्या काकांनी मला तुमच्याकडून इन्श्युरन्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आणि मी खूपच आनंदी आहे

quote-icons
male-face
वसंत पटेल

माय:हेल्थ सुरक्षा

12 सप्टेंबर 2022

गुजरात

माझ्याकडे एचडीएफसीची पॉलिसी आहे आणि एचडीएफसी टीम सोबत माझा अनुभव चांगला राहिलेला आहे.

quote-icons
male-face
श्यामल घोष

ऑप्टिमा रिस्टोअर

10 सप्टेंबर 2022

हरियाणा

या जीवघेण्या रोगावर उपचार घेत असताना उत्कृष्ट सर्व्हिसेसमुळे मला मानसिकदृष्ट्या अतिशय सुरक्षित आणि शांतता अनुभवण्यास मदत झाली आहे. भविष्यातही समान उत्कृष्ट सर्व्हिसची अपेक्षा आहे.

quote-icons
male-face
नेल्सन

ऑप्टिमा सिक्युअर

10 जून 2022

गुजरात

मला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्सच्या विविध प्रॉडक्ट्सविषयी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह अतिशय स्पष्ट आणि व्यवस्थित होते. तिच्याशी बोलून खूप छान वाटले.

quote-icons
male-face
ए व्ही राममूर्ती

ऑप्टिमा सिक्युअर

26 मे 2022

मुंबई

मला कॉल केल्याबद्दल आणि ऑप्टिमा सिक्युअर आणि एनर्जी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या विविध वैशिष्ट्यांबाबत मला सविस्तरपणे समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्सच्या विविध प्रॉडक्ट्सविषयी अतिशय स्पष्ट, व्यवस्थित आणि जाणकार होते. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटले.

Scroll Left
Willing to Buy A medical insurance Plan?
आजची माहिती तर मिळाली, उद्याच्या सुरक्षेसाठी तयार आहात का?
तुमचा प्लॅन आजच कस्टमाइज करा.

नवीनतम फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स ब्लॉग वाचा

Scroll Right
What Amount of Health Insurance Coverage is Ideal for a 40-Year-Old With Family?

कुटुंबासह 40-वर्षाच्या व्यक्तीसाठी किती रकमेचे हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज आदर्श आहे?

अधिक जाणून घ्या
5 जून, ,2025 रोजी प्रकाशित
Increasing the Sum Insured of Your Family Floater Plan – When to Do So?

तुमच्या फॅमिली फ्लोटर प्लॅनची सम इन्श्युअर्ड वाढवणे - हे कधी करावे?

अधिक जाणून घ्या
23 जानेवारी, 2025 रोजी प्रकाशित
List of government Mediclaim policies for families

कुटुंबांसाठी सरकारी मेडिक्लेम पॉलिसींची यादी

अधिक जाणून घ्या
16 डिसेंबर, 2024 रोजी प्रकाशित
How to Save on Family Health Insurance Premiums

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमवर बचत कशी करावी

अधिक जाणून घ्या
15 नोव्हेंबर, 2024 रोजी प्रकाशित
Do You Need a Top-Up Plan for Family Health Insurance?

तुम्हाला फॅमिली हेल्थ इन्श्युरन्ससाठी टॉप-अप प्लॅनची आवश्यकता आहे का?

अधिक जाणून घ्या
12 नोव्हेंबर, 2024 रोजी प्रकाशित
Scroll left

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्सविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुमच्या संपूर्ण जवळच्या कुटुंबाला एका एकाच प्रॉडक्ट अंतर्गत कव्हरेज देतो. हा प्लॅन कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज तसेच प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप्स, कॅशलेस उपचार, आजीवन रिन्यूवल इ. अतिरिक्त लाभ प्रदान करतो. फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत निश्चित रक्कम इन्श्युअर्ड ठेवली जाते, जी सर्व सदस्यांना कव्हर करते.

गेल्या काही वर्षांपासून हेल्थ केअर खर्च सातत्याने वाढत आहेत. वाढता वैद्यकीय खर्च आणि प्रचलित आजारांमुळे, पुरेसे कव्हर असलेली फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी एक कवच म्हणून काम करते.. याशिवाय, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वैयक्तिक पॉलिसी खरेदी करण्याच्या तुलनेत फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खिशाला परवडणारी आहे.

फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमधील फ्लोटिंग सम इन्श्युअर्ड निश्चित असतो आणि तो सर्व कुटुंब सदस्यांमध्ये शेअर केला जातो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे किंवा नियोजित हॉस्पिटलायझेशनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते, तेव्हा तुम्ही तुमच्या इन्श्युरन्स प्रदात्याच्या एम्पॅनेल्ड नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचाराचा पर्याय निवडू शकता.

नेटवर्क नसलेल्या हॉस्पिटल्सच्या बाबतीत, तुम्ही तुमच्या इन्श्युरन्स प्रदात्याच्या क्लेम निकाली काढणाऱ्या टीमकडे उपचार आणि बिलिंग-संबंधित कागदपत्रे सादर करून प्रतिपूर्तीचा क्लेम करू शकता.. इन्श्युरन्स प्रदाता निवडताना, जास्त क्लेम सेटलमेंट रेशिओ असलेला प्रदाता निवडणे शिफारसीय आहे.

होय, तुम्ही फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये तुमच्या पालकांना समाविष्ट करू शकता. तुम्ही पॉलिसी खरेदी करताना किंवा पॉलिसी रिन्यूवलच्या वेळी हे करू शकता.

होय, तुम्ही फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये तुमचा नवजात बालक समाविष्ट करू शकता. जर तुमच्याकडे मॅटर्निटी कव्हर असेल तर तुमचा नवजात बालक पॉलिसीमध्ये 90 दिवसांपर्यंत कव्हर केला जातो. अन्यथा, तुम्ही 90 दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर तुमच्या विद्यमान पॉलिसीमध्ये तुमच्या नवजात बाळाचा समावेश करू शकता.

होय, तुम्ही पॅनेलवर असलेल्या हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधून हॉस्पिटल निवडल्यास कॅशलेस उपचाराचा पर्याय उपलब्ध आहे.. बिल थेट तुमच्या इन्श्युरन्स प्रदात्याद्वारे पॅनेलवरील हॉस्पिटलला दिले जाते.. एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी भारतभर 16000+ नेटवर्क हॉस्पिटल्ससह उपलब्ध आहेत.

होय, पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन, पॉलिसी रिन्यूवलच्या वेळी कुटुंबातील सदस्यांना हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये समाविष्ट करता येते.

खर्च/प्रीमियम अनेक घटकांवर आधारित भिन्न असू शकते, जसे की इन्श्युअर्ड व्यक्तींची संख्या, निवडलेले कमाल कव्हरेज, इन्श्युअर्ड सदस्यांचे वय आणि अशा बऱ्याच गोष्टी. तुम्ही फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरू शकता किंवा स्पष्ट अंदाज मिळविण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधू शकता.

तुमच्या विद्यमान पॉलिसीमध्ये कुटुंबातील सदस्य जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या इन्श्युररशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही आवश्यक डॉक्युमेंट्स सादर करू शकता, जसे की ओळखपत्र, वयाचा पुरावा इ.

होय, तुम्ही आधीच नियोक्त्याच्या हेल्थ प्लॅन अंतर्गत कव्हर असलात तरी तुमच्या कुटुंबासाठी स्वतंत्र मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी घेणे शिफारसीय आहे.

• एम्प्लॉयर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्ही संस्थेसोबत काम करेपर्यंत वैध असते.

• तुम्‍ही संस्‍था बदलताच किंवा तुमचा स्‍वत:चा व्यवसाय सुरू करताच तुमचे हेल्थ कव्‍हर संपेल.. तुम्हाला अन्य नोकरी मिळेपर्यंत तुम्ही अनइन्श्युअर्ड राहाल.

• वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, तुमच्याकडे कोणतेही सुरक्षा कवच नसेल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता.

अशा परिस्थितीत, कुटुंबासाठी स्वतंत्र मेडिकल पॉलिसी तुमच्या मदतीला येईल.

एखाद्याने एचडीएफसी एर्गोच्या फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची निवड का करावी, याची वैशिष्ट्ये खाली सूचीबद्ध केली आहेत. • परवडणारे प्रिमियम • कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज • 16000+ एम्पॅनेल्ड रुग्णालयांचा नेटवर्क • आजीवन रिन्यूवल • ऑनलाईन अतिरिक्त 5% डिस्काउंट • प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च • प्राप्तिकर कायद्याच्या सेक्शन 80D अंतर्गत टॅक्सची बचत.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन सामान्यपणे एकाच सम इन्श्युअर्ड अंतर्गत पॉलिसीधारक, जोडीदार आणि अवलंबित मुले यांना कव्हर करते. काही प्लॅन्स अवलंबित पालक किंवा इतर कुटुंबीय, जसे की सासू-सासरे किंवा भावंडे, यांनाही कव्हरेज देण्याची परवानगी देऊ शकतात. जितके अधिक सदस्य समाविष्ट कराल तितका प्रीमियम वाढू शकतो. 3 जणांच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करणे हे 4 जणांच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्यापेक्षा कमी खर्चिक असते. त्यामुळे सर्व कव्हर केलेल्या सदस्यांसाठी पुरेसा ठरेल असा सम इन्श्युअर्ड निवडणे महत्त्वाचे आहे.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनसाठी पात्रता मुख्यतः दोन घटकांवर अवलंबून असते:

पूर्व-विद्यमान वैद्यकीय स्थिती: पॉलिसी खरेदी करताना कोणत्याही विद्यमान आजारांची माहिती देणे आवश्यक आहे. काही आजार, प्रतीक्षा कालावधीनंतर कव्हर केले जाऊ शकतात, तर काहींवर जास्त प्रीमियम लागू होऊ शकतो.

वय: 18 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती पॉलिसी खरेदी करण्यास पात्र आहेत. अनेक इन्श्युरर नवजात बाळांना देखील समाविष्ट करण्याची परवानगी देतात, परंतु पालक आधीपासूनच प्लॅन अंतर्गत कव्हर असणे आवश्यक आहे.

फॅमिली कव्हरेजसाठी हेल्थ इन्श्युरन्समध्ये, सम इन्श्युअर्ड सर्व कव्हर असलेल्या सदस्यांमध्ये शेअर केला जातो. पॉलिसी वर्षात एका सदस्याने संपूर्ण सम इन्श्युअर्ड वापरल्यास, पॉलिसीमध्ये सम इन्श्युअर्ड रिस्टोरेशन किंवा रिफिल लाभ उपलब्ध नसल्यास, उर्वरित सदस्यांना पुढील क्लेमसाठी कव्हरेज मिळणार नाही. रिस्टोरेशन सह, पॉलिसीच्या अटींच्या अधीन, नंतरच्या क्लेमसाठी सम इन्श्युअर्ड (आंशिक किंवा पूर्णपणे) पुन्हा उपलब्ध केला जातो.

होय, पॉलिसी रिन्यूवलच्या वेळी सम इन्श्युअर्ड वाढवता येतो. इन्श्युरर सामान्यतः रिन्यूवलच्या वेळी अंडररायटिंग आणि पॉलिसीच्या अटींनुसार कव्हरेज अपग्रेड करण्याची परवानगी देतात. वाढीव सम इन्शुअर्डसाठी काही लाभ किंवा पूर्व-विद्यमान आजारांवर प्रतीक्षा कालावधी लागू होऊ शकतो. वैद्यकीय खर्च कालांतराने वाढत असल्याने सम इन्शुअर्ड वाढवणे शिफारसीय आहे.

फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स सीनिअर सिटीझन्ससाठी योग्य असू शकतो जर प्लॅनमध्ये त्यांचा समावेश आणि पुरेसा कव्हरेज असेल. तथापि, सीनिअर सिटीझन्ससह सर्वात वयस्क सदस्याच्या वयावर प्रीमियम ठरवले जातो, त्यामुळे एकूण प्रीमियम वाढू शकतो.

अनेक प्रकरणांमध्ये, स्वतः, जोडीदार आणि मुलांसाठी फॅमिली फ्लोटर ठेवून पालकांसाठी स्वतंत्र सीनिअर सिटीझन हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन घेणे अधिक योग्य ठरू शकते

जर कव्हर असलेला कुटुंब सदस्य विवाहबद्ध झाला किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाला, तर तो फॅमिली मेडिक्लेम प्लॅनमध्ये राहण्यास पात्र नसेल. अशा वेळी संबंधित सदस्य पोर्टेबिलिटी द्वारे इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीकडे जाऊ शकतो. तसे करताना प्रतीक्षा कालावधी सारखे जमा झालेले फायदे गमावले जातील का, हे तपासता येते.

होय, तुम्ही एकाच वेळी फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन आणि इंडिव्हिड्युअल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी दोन्ही ठेवू शकता. यामुळे एकूण कव्हरेज वाढण्यास मदत होते आणि अतिरिक्त आर्थिक सुरक्षा मिळते. मेडिकल क्लेम फॅमिली फ्लोटर सम इन्शुअर्डपेक्षा जास्त असल्यास, पॉलिसीच्या अटींनुसार उर्वरित खर्च भागवण्यासाठी इंडिव्हिड्युअल पॉलिसी वापरता येते.

एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्युअर हा भारतातील पती आणि पत्नीसाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सपैकी एक आहे कारण तो वाढता वैद्यकीय खर्च, अपुरा सम इन्श्युअर्ड, आणि अनपेक्षित क्लेम कपात यासारख्या महत्त्वाच्या समस्यांना 1ल्या दिवसापासून 4 कव्हरेज देऊन हाताळतो. हा हॉस्पिटलायझेशनमध्ये कोणतीही रूम रेंट किंवा ICU रेंट मर्यादेशिवाय, पूर्ण स्वातंत्र्य देखील देतो, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचा जोडीदार अतिरिक्त खर्चाशिवाय कोणतीही रूम निवडू शकता. जास्त कव्हरेज आणि लवचिकतेचा हा संगम भारतातील जोडप्यांसाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय बनतो.

अवॉर्ड्स आणि मान्यता

Image

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

Image

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

Image

iAAA रेटिंग

Image

ISO सर्टिफिकेशन

Image

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

Scroll Right
Scroll Left
सर्व अवॉर्ड्स पाहा