व्यक्तींसाठी - कोणताही भारतीय निवासी जो प्रॉपर्टीचा मालक आणि/किंवा रहिवासी असेल तो होम इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकतो. तथापि, होम इन्श्युरन्स - मल्टी इयर पॉलिसी केवळ घर / फ्लॅट मालकांना जारी केली जाऊ शकते आणि भाडेकरूंना नाही. सोसायटीसाठी - सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीचा कोणताही अधिकृत सदस्य सोसायटी बिल्डिंग आणि सामाईक उपयोगितांना कव्हर करण्यासाठी पॉलिसी खरेदी करू शकतो ज्यामध्ये पॉलिसी सोसायटीच्या नावावर जारी करणे आवश्यक आहे.
तुमचे इन्श्युरन्स कव्हर पॉलिसी शेड्यूलवर दर्शविलेल्या प्रारंभ तारखेपासून सुरू होते, ही प्रीमियम पेमेंटच्या तारखेनंतर कोणतीही निवडलेली तारीख (15 दिवसांनंतरची नाही) असू शकते.
प्रॉपर्टीचे मूल्यांकन प्रति चौरस फूट बांधकामाच्या खर्चासह प्रॉपर्टीच्या बिल्ट-अप क्षेत्राचे गुणाकार करून केले जाते. सध्या प्रॉपर्टीच्या लोकेशन आणि बांधकामाच्या प्रकारानुसार बांधकामाचा खर्च जवळपास 1500 ते 2000 घेतला जातो.
तुम्ही तुमच्या बँकद्वारे जारी केलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे, इंटरनेट बँकिंग, वॉलेट/कॅश कार्ड, EMI, UPI (जीपे, फोनपे, पेटीएम, इ.), QR कोडद्वारे तुमचा पॉलिसी प्रीमियम भरू शकता. कृपया नोंद घ्या, आम्ही कोणत्याही क्लब कार्ड किंवा डायनर्स कार्डमार्फत पेमेंट स्वीकारत नाही.