एचडीएफसी एर्गो विषयी

एचडीएफसी एर्गो
इन्श्युरन्स अवेरनेस अवॉर्ड ज्युनियर

ओव्हरव्ह्यू

भारतात जनरल इन्श्युरन्सच्या कमी प्रवेशासह, एचडीएफसी एर्गो ने एक पाऊल पुढे टाकले आणि एचडीएफसी एर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अवॉर्ड ज्युनियर, या क्विझ काँटेस्ट च्या माध्यमातून जनरल इन्श्युरन्सविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी भारताचे भविष्य असलेल्या तरुण मनांपर्यंत पोहोचले. क्विझच्या मागील कल्पना म्हणजे आव्हानाच्या स्वरूपात इन्श्युरन्सविषयी जागरूकता निर्माण करणे ज्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ते समजून घेणे मजेदार व सोपे होईल.

आमचा दृष्टीकोन

एचडीएफसी एर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अवॉर्ड ज्युनियर, इन्श्युरन्स जागरूकता आणि सशक्तीकरणासाठी शिकण्याचा उपक्रम हे आवश्यक जीवन कौशल्य म्हणून इन्श्युरन्स साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी एक उपक्रम आहे. एचडीएफसी एर्गोद्वारे घेतलेला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.

आम्ही ते कसे केले?

2016 मध्ये आयोजित त्याच्या पहिल्या एडिशन मध्ये, दोन राउंड मध्ये क्विझची रचना करण्यात आली होती - सेमी-फायनल एलिमिनेशन राउंड (MCQ लेखी आव्हान) आणि ग्रँड फिनाले क्विझ स्पर्धा. हा क्विझ टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आला ज्यामध्ये मुंबईमधील सर्वोत्तम शाळांना पहिल्या टप्प्यात प्राथमिक राउंडसाठी तीन विद्यार्थ्यांच्या टीमला नामांकित करण्यासाठी आमंत्रित केले गेले. या टप्प्याचा भाग म्हणून, सहभागी शाळांच्या परिसरात इन्श्युरन्सची संकल्पना स्पष्ट करणारे इन्श्युरन्स अवेरनेस वर्कशॉप एचडीएफसी एर्गोच्या प्रतिनिधींद्वारे आयोजित केले गेले. वर्कशॉप दरम्यान अधिक तपशीलवार विषय समजून घेण्यास मदत होण्यासाठी विद्यार्थ्यांना इन्श्युरन्सवर बुकलेट देखील प्रदान केली गेली.

एचडीएफसी एर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अवॉर्ड ज्युनियरच्या पहिल्या एडिशनचा ग्रँड फिनाले 27th सप्टेंबर 2016 रोजी एचडीएफसी एर्गोच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ आयोजित केला गेला.

आमची कामगिरी

मुंबईतील शाळांमध्ये पहिल्याच एचडीएफसी एर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अवॉर्ड ज्युनियरला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने उत्साही, एचडीएफसी एर्गोने 2017 मध्ये दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या आणखी चार शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली, ज्यामुळे ती राष्ट्रीय स्पर्धा बनली.

166+

शाळांनी आमच्या इन्श्युरन्स एक्स्पर्टद्वारे आयोजित टाऊनहॉलमध्ये भाग घेतला

125+

शाळांनी 5 शहरांमध्ये सहभाग घेतला.

33k+

8th, 9th क्लास मधील विद्यार्थ्यांना मूलभूत इन्श्युरन्स ज्ञान दिले गेले

अवॉर्ड्स आणि मान्यता
x