Logo
PMFBY States ( राज्य ) - Rabi (रबी) 2020-2021
R-WBCIS States ( राज्य ) - Rabi (रबी) 2020-2021

एचडीएफ़सी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनीला, महाराष्ट्र सरकारद्वारे , पुनर्रचित हवामनवार आधारीत फळपिक विमा योजना (आर डबल्यू बी सी आय एस) लागू करण्याकरिता अधिकृतता मिळालेली असून, याकरता अहमदनगर, अमरावती, नाशिक, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, सातारा, परभणी, जालना, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रबी हंगाम २०२० अंतर्गत खालील फळपिके सूचित करण्यात आलेली आहेत:

  • अहमदनगर - संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा
  • अमरावती - संत्रा, मोसाबी, केळ
  • सिंधुदुर्ग - केळी, आंबा, काजु
  • नाशिक - डाळिंब, द्राक्ष, आंबा, काजु
  • वाशिम - संत्रा, डाळिंब, आंबा
  • यवतमाळ - संत्रा, केळ
  • सातारा - डाळिंब, द्राक्ष , केळी, स्ट्रॉबेरी
  • परभणी - संत्रा. मोसाबी, डाळिंब, केळी, आंबा
  • जालना - मोसाबी, संत्रा, डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा
  • लातूर - डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा
  • कोल्हापूर - द्राक्ष, केळी, आंबा, काजु
योजना सम्बंधित जानकारी

योजनेची उद्दीष्टे:-

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

राज्यानुसार जिल्हा सहकारी:

राज्य जिल्ह्याचे नाव विक्री सहाय्यकाचे नाव पत्ता संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्र नाशिक शैलेश ठाकूर पहिला मजला, पूजा एन्क्लेव, कॉलेज रोड, नाशिक-422005 7304513408
महाराष्ट्र अहमदनगर इंद्रजित सरवदे पहिला मजला, साई आइकॉन, एस. न. 95 /3, अ‍ॅक्सीज बँकेच्या सामोर, सवेडी रोड, अहमदनगर - 414001. 8888303286
महाराष्ट्र वाशिम जयेश पटले गॅस गोडाउनच्या बाजूला, माधव नगर लखाला, वाशीम-444505 7304528741
महाराष्ट्र यवतमाळ दिगेश कटरे इस्लाम पुरा, गौसिया मस्जिदच्या बाजूला, हाफिज इब्राहिम हाऊस, यवतमाळ 9373111517
महाराष्ट्र अमरावती विनायक गुल्हाने दुकान क्रमांक 30 & 31, पहिला मजला, लड्डा मॉल, नाझुल प्लॉट क्रमांक 130/1, शिट क्रमांक-67-C, राजकमल चौक, अमरावती-444601 7208099860
महाराष्ट्र सातारा शेखर कपाळे युनिट नं. 1 प्लॉट नं. 504/1, सुश्रुत अपार्टमेंट, दुसरा मजला, सादर बाजार (बस स्टॅन्डच्या मागे) सातारा -415001 7387979793
महाराष्ट्र जालना बाळासाहेब गोपाळ कुंडलिक निवास, कचेरी रोड, शनी मंदिरच्या बाजूला, लँडमार्क ओम इंटरनेट कॅफे, ओल्ड जालना, जालना 9403788142
महाराष्ट्र जालना निलेश देवकर कुंडलिक निवास, कचेरी रोड, शनी मंदिरच्या बाजूला, लँडमार्क ओम इंटरनेट कॅफे, ओल्ड जालना, जालना 8275557777
महाराष्ट्र लातूर अविनाश खेडकर 96, विठ्ठल मंदिर, भारत सोसायटीच्या बाजूला, नांदेड नाका, लातूर-413512 8888436054
महाराष्ट्र परभणी विष्णू नागरगोजे नानल पेठ, परभणी-431401 9657964606
महाराष्ट्र कोल्हापूर राजेश गायकवाड पहिला मजला, सी एस नं. 202/3, अथर्व आयकॉन, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कवाला नाका, कोल्हापूर -416003 9850237334
महाराष्ट्र सिंधुदुर्ग मोहन नाटेकर जंगली पिरक्षा बाबाच्या बाजूला, 109 माठेवाडा, झिरागवाडी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग 9175051548
दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.