Logo

महाराष्ट्र्र शासनाद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची हवामान आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS ) लागू करण्याकरिता निवड करण्यात आली असून याकरिता अकोला, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर,परभणी, सांगली, सातारा, ठाणे, वर्धा या जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना खरिफ (मृग बहार) हंगाम २०२३ -२४ मध्ये खालील फळ पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत.

अधिसूचित जिलों में अधिसूचित फसलें निम्ननुसार हैं :

  • अकोला - पेरू लिंबू मोसंबी संत्रा डाळिंब
  • औरंगाबाद - सिताफळ पेरू लिंबू मोसंबी डाळिंब चिकू
  • बीड - सिताफळ पेरू लिंबू मोसंबी संत्रा डाळिंब चिकू
  • हिंगोली - मोसंबी संत्री
  • जालना - सिताफळ पेरू लिंबू मोसंबी संत्रा डाळिंब चिकू
  • कोल्हापूर - पेरू
  • लातूर - सिताफळ लिंबू डाळिंब
  • परभणी - सिताफळ पेरू लिंबू मोसंबी संत्रा डाळिंब चिकू
  • सांगली - द्राक्ष पेरू लिंबू डाळिंब चिकू
  • सातारा - डाळिंब
  • ठाणे - चिकू
  • वर्धा - लिंबू मोसंबी संत्री
योजना सम्बंधित जानकारी

योजनेची उद्दीष्टे:-

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

राज्यानुसार जिल्हा सहकारी:

राज्य जिल्ह्याचे नाव विक्री सहाय्यकाचे नाव पत्ता संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्र अकोला जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), महालक्ष्मी द्वार रिंग रोड अकोला जिल्हा अकोला 444004 9921250033
महाराष्ट्र औरंगाबाद जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), दुकान क्र. F30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, उल्कानगरी, औरंगाबाद 431005 7972694448
महाराष्ट्र बीड जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), H. नंबर 1 शिक्षा कॉलनी बस स्टँड मागे बीड-431122 9518513418
महाराष्ट्र हिंगोली जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), हनुमान नगर, SRP गेट जवळ कातकडी बायपास हिंगोली कळमनुरी रोड, हिंगोली- 431513 8788207241
महाराष्ट्र जालना जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोल पंपासमोर, अंबड रोड, जालना - 431203 8275557777
महाराष्ट्र लातूर जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), जटल हॉस्पिटल जवळ केशवराज कॉलेज लातूर अंबेजोगाई रोड लातूर-41351 8888436054
महाराष्ट्र परभणी जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), दुकान क्रमांक 3, पहिला मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, उघाडा महादेव मंदिर, ममता कॉलनीजवळ, परभणी-431401. 8485868781
महाराष्ट्र सांगली जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), पहिला मजला, इंद्रनील प्लाझा, CS-No 447/1, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, सांगली 416416 8976943452
महाराष्ट्र सातारा जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), युनिट क्रमांक 1 प्लॉट क्रमांक 504/1, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे) सातारा - 415001 8976943452
महाराष्ट्र ठाणे जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), 4था मजला, लेक सिटी मॉल - एक कापूरबावडी जंक्शन, माजिवडा नाका, ठाणे - 400607 7208956097
महाराष्ट्र वर्धा जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), सौरभ कॉम्प्लेक्स जवळ, कुबोटा शोरूम, सावंगी मेघे, मास्टर कॉलनी, वर्धा- 442001 9921250033
महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), CS क्रमांक 934, ई वॉर्ड, लाईन बाजार, कोल्हापूर -416006 9977031755
दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.